Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: पुणे, मुंबईसह राज्याच्या 'या' भागात पाऊस लावणार हजेरी; तर उत्तर कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज

Weather Update: राज्यात पुण्यासह २६ जिल्ह्यांमध्ये आज (मंगळवारी) वादळी वाऱ्यासह वळिवाच्या पावसाच्या सरी बरसतील, असा ‘येलो अलर्ट’ हवामान विभागाने सोमवारी वर्तविला आहे.

सकाळ वृत्तसेवा

राज्यात पुण्यासह २६ जिल्ह्यांमध्ये मंगळवारी (ता. १४) वादळी वाऱ्यासह वळिवाच्या पावसाच्या सरी बरसतील, असा ‘येलो अलर्ट’ हवामान विभागाने सोमवारी वर्तविला. राज्यात सर्वाधिक तापमान जळगावमध्ये ४१.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले.

राज्यात वळिवाच्या पावसाच्या सरींनी सर्वदूर हजेरी लावल्याने उन्हाची काहिली काही प्रमाणात कमी झाली आहे. राज्यात २६ जिल्ह्यांमध्ये मंगळवारी वादळी वाऱ्यासह वळिवाच्या सरी बरसण्याचा इशारा कायम आहे. उत्तर कोकणात उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला असून राज्यात उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे.

दक्षिण कर्नाटक आणि चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे; तर वायव्य मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कर्नाटकपर्यंत चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव आहे.

पुण्यात पावसाची हजेरी

शहरात सोमवारी सकाळपासून आकाश अंशतः ढगाळ होते. दुपारी उन्हाचा चटका काही प्रमाणात वाढला होता. त्यामुळे रविवारच्या तुलनेत सुमारे कमाल तापमान ४.९ अंश सेल्सिअसने वाढले. सायंकाळी साडेपाचपर्यंत शिवाजीनगर येथील वेधशाळेत कमाल तापमानाचा पारा ३६.३ अंश सेल्सिअस नोंदला गेला.

उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट): पालघर, ठाणे, मुंबई.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

पुण्यातील हवामान अंदाज

मंगळवारी आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारनंतर ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची ५१ ते ७५ टक्के शक्यता आहे. कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT