Ahmednagar Murder Mystry esakal
महाराष्ट्र बातम्या

Ahmednagar Murder Mystry: आत्महत्या नाही तर घातपात ! तीन चिमूरड्यांसह ७ जणांच्या मृत्यूमागे करणी ?

महाराष्ट्रातील पुण्यात (Pune) एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रातील पुण्यात (Pune) एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. प्रथम माहितीनुसार आत्महत्या असल्याचे बोलले जात होते. मात्र, आत्महत्या नव्हे तर घातपात असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. (pune murder dead bodies of 7 members of one family found in bhima river )

पुण्याच्या ग्रामीण भागातील पारगाव हद्दीत असणाऱ्या भीमा नदीपत्रात एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह आढळून आले होते. प्राथमिक तपासात हे सर्व बुडून मृत्यू झाल्याचे दिसत असून पोलीस याचा तपास केला असता करणी प्रकरणी हत्या करण्यात आली आहे. याबाबतची माहिती एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिली आहे.

'नाटू नाटू..'ला मिळाला पुरस्कार..पण पुढे काय?

हत्या कशी करण्यात आली?

मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादातुन हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मोहन पवार त्यांच्या कुटूंबासह भीमा नदीत सापडले. त्यांचाच एक मुलगा अमोल पवार त्याच्या एका चुलत भावाबरोबर ज्याचे नाव धनंजय पवार आहे तो गेल्या तीन महिन्यापूर्वी, पेरणी फाटा येथे गेला होता. तो परतताना त्यांचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये धनंजय पवारचा मृत्यू झाला. परंतु धनंजय पवार यांच्या घरच्यांना संशय आहे की, या सर्व कुटूंबांनी मिळून याच्यावर करणी केली. त्याच्यातून हत्या झाली.

त्यामुळे धनंजय पवार यांच्या कुटूंबाने कट रचला. मोहन पवार यांच्या कुटूंबाला यवत परत आणलं. आणि त्यानंतर रात्री जवळपास साडेबारा एकवाजेच्या सुमारास यांना गळा दाबून मारण्यात आलं. त्यानंतर भीमा नदीत फेकण्यात आलं. इतकेच नव्हे तर त्यामध्ये तीन मुलं देखील आहेत. झोपलेल्या अवस्थेतच ७ जणांची हत्या करण्यात आली.

सर्वात आधी 18 जानेवारीला या नदीतून एका महिलेचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर 19 जानेवारीला नदीत अजून एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर 20 जानेवारीला पुन्हा एका महिलेचा मृतदेह आढळून आला.

Woman Suicide : पतीने मोबाईल ब्लॉक केल्यामुळे विवाहितेची आत्महत्या

पोलीस या सगळ्याचा तपास करत असतानाच, 21 तारखेला पुन्हा एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. म्हणजेच 18 ते 21 जानेवारी या कालावधीमध्ये एकूण चार मृतदेह सापडले. यानंतर पोलिसांनी नदीच्या विविध भागात शोधमोहीम सुरू केली असता आणखी 3 मृतदेह सापडले. हे तिन्ही मृतदेह लहान मुलांचे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT