pune crime
pune crime esakal
महाराष्ट्र

Pune Crime: डोक्यावर गांजाचं पोतं घेऊ निघाल्या सासू-सून; पोलिसांनी केली 'अशी' कारवाई

संतोष कानडे

Pune : चक्क पोत्यामध्ये गांजा घेऊन निघालेल्या सासू-सुनेला पोलिसांना ताब्यात घेतलं होतं. त्यांच्याकडे तब्बल ४ लाख रुपयांचा गांजा मिळून आला आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई केली.

पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथक क्रमांक १ ने ही कारवाई केली. लोणीकाळभोर परिसरातून दोघी सासू-सुनेला ताब्यात घेतलं आहे. सोरतापवाडी येथील सार्वजनिक रस्त्यावर दोन महिला डोक्यावर नायलॉनच्या पांढऱ्या रंगाच्या पिशव्यांमध्ये गांजा घेऊन जात होत्या. त्यांनी पोलिसांना सुरुवातील उडवाउडवीची उत्तरं दिली. पोलिसांनी पोत्यांची झडती घेतली असता एका महिलेच्या पोत्यात २ लाख रुपये किंमतीचा १० किलो २४५ ग्रॅम गांजा आढळून आला तर दुसऱ्या महिलेकडे २ लाख रुपयांपेक्षा अधिक रुपयांचा १० किलो गांजा मिळून आला.

हेही वाचाः First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

सासू-सुनेकडे २० किलो ६१० ग्रॅम गांजा सापडला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढीत तपास पोलिस करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT