कृषी विद्यापीठे  sakal
महाराष्ट्र बातम्या

Pune : राहुरी विद्यापीठाचे सहा वाण, चार कृषी यंत्रे, आणि ७० शिफारशींना मान्यता

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि राज्यातील चारही कृषी विद्यापीठे

सकाळ वृत्तसेवा

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांसाठी विविध पिकांचे सहा वाण, चार कृषीयंत्रे-अवजारे आणि ७० कृषी तंत्रज्ञान शिफारशी प्रसारीत करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाच्या प्रसारण केंद्राने दिली.

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि राज्यातील चारही कृषी विद्यापीठे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे तीन दिवसीय संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची ५० वी बैठकीमधील समितीने यास मान्यता दिली.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संचालक संशोधन डॉ. सुनिल गोरंटीवार यांच्या नेतृत्वाखाली शेतपिके वाण प्रसारण व शेतपिके वाण संरक्षण आणि शेतकरी, अधिकारी कायद्यांतर्गत या कृषी विद्यापीठाच्या नवीन वाण आणि तंत्रज्ञान शिफारशी सादर केल्या.

यामध्ये रब्बी ज्वारी-फुले पुर्वा, राजमा-फुले विराज, उडीद-फुले राजन, मुग-फुले सुवर्ण, ऊस-फुले १५०१२ आणि हळद-फुले हरिद्रा हे वाण प्रसारीत करण्यात आले. तसेच ट्रॅक्टरचलीत फुले सेंद्रिय भरखते देण्याचे यंत्र, ट्रॅक्टरचलीत फुले दोन ओळींमध्ये चालणारा फॉरवर्ड-रिव्हर्स रोटाव्हेटर, ट्रॅक्टरचलीत फुले केळी खुंट कुट्टी यंत्र व फुले रस काढणी यंत्र प्रसारीत करण्यात आले.

प्रसारीत वाण

१. रब्बी ज्वारी- फुले पूर्वा : रब्बी ज्वारीचा हा न लोळणारा व काढणीस सुलभ वाण, कोरडवाहू क्षेत्रातील भारी जमिनीसाठी महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारित करण्यात आला आहे.

२. राजमा- फुले विराज : राजमा पिकाचा अधिक उत्पादनक्षमता व फिक्कट पांढऱ्या रंगावर तपकिरी रंगाच्या छटा असलेला वाण पश्चिम महाराष्ट्रात खरीप हंगामात लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला आहे.

३. उडिद- फुले राजन : उडिदाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या वाणाची महाराष्ट्रातील खरीप हंगामासाठी प्रसारित करण्यात आली आहे.

४. मुग- फुले सुवर्ण : मुग पिकाचा हा वाण अधिक उत्पादन देणारा, लवकर तयार होणारा असून या वाणाची महाराष्ट्रातील खरिप हंगामासाठी प्रसारित करण्यात आली आहे.

५. ऊस- फुले १५०१२ : ऊसाचा हा वाण मध्यम कालावधीत पक्व होणारा, अडसाली, पूर्व आणि सुरू हंगामात महाराष्ट्रासाठी लागवडीकरिता प्रसारित करण्यात आला आहे.

६.हळद- फुले हरिद्रा : हळदीचा हा वाण ओल्या आणि वाळलेल्या हळदीच्या अधिक उत्पादन तसेच गर्द पिवळसर गाभ्याचा रंग, सरळ हळकुंडे आणि चांगले कुरकुमीन असल्याने पश्चिम महाराष्ट्रासाठी प्रसारित करण्यात आला आहे.

प्रसारीत यंत्रे

१. फळबागेला खते देण्यासाठी ट्रॅक्टर चलित फुले सेंद्रिय भरखते देण्याचे यंत्र प्रसारित करण्यात आले आहे.

२. ऊसाच्या दोन ओळीतील आंतरमशागत व भर घालणे करिता ट्रॅक्टरचलित फुले दोन ओळींमध्ये चालणारा फॉरवर्ड-रिव्हर्स रोटाव्हेटर प्रसारित करण्यात आले आहे.

३. केळीच्या बागेत खुंटाची कुट्टी करणारे ट्रॅक्टर चलित फुले केळी खुंट कुट्टी यंत्र प्रसारित करण्यात आले आहे.

४. फळे व भाज्यांचा रस काढण्यासाठी फुले रस काढणी यंत्र प्रसारित करण्यात आले आहे.

कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील : या वाणांमुळे व तंत्रज्ञान शिफारशींमुळे पिकांची उत्पादकता वाढण्यास मदत होईल व नवीन यंत्र व अवजारांमुळे शेतकऱ्यांचे श्रम कमी होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT