Pune Rain esakal
महाराष्ट्र बातम्या

Pune Rain : पुण्यात जोरदार पावसाला सुरुवात; अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी

संतोष कानडे

पुणेः पुणे शहरातील काही भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. शहरातील औंध, बाणेर रोड, विद्यापीठ परिसर, सांगवी या भागात जोरदार स्वरुपाच्या पावसाला सुरुवात झाली आहे.

यावर्षी मान्सून लांबणार अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत. मात्र मान्सूनपूर्व पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. पुणे शहरात सध्या जोरदार पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.

दरम्यान, आज दुपारनंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. यामध्ये अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, मुंबई, रायगड या जिल्ह्यांचा समावेश आहे.

बाणेर, पाषाण या भागामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. वातावरणात गारवा पसरला असला तरी खड्ड्यांमुळे किरकोळ अपघात होत आहेत. शिवाय या भागांमध्ये वाहतूककोंडी झाल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'TET' सक्तीचा नेमका आदेश काय? ११० पानांच्या आदेशावर शासन सुस्पष्ट परिपत्रक काढून दूर करणार संभ्रम; २०१० पूर्वीच्या शिक्षकांना दिलासा मिळू शकतो, पण...

उजनी धरण 100 टक्के भरलेले! शेतीसाठी सुटणार 15 जानेवारीनंतर पाणी; यंदा उन्हाळ्यात शेतकऱ्यांना 3 आवर्तने, ‘या’ 3 उपसा सिंचन योजना जूनपर्यंत पूर्ण होणार

Morning Breakfast Recipe: थंडीच्या दिवसात सकाळी नाश्त्यात झटपट बनवा ब्रोकोली सुप, सोपी आहे रेसिपी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 11 डिसेंबर 2025

Panchang 11 December 2025: आजच्या दिवशी हळद, बेलफळ चूर्ण किंवा आवळकाठी चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे

SCROLL FOR NEXT