महाराष्ट्र

पुण्यातील रस्त्यांची कामे कालमर्यादेत; अशोक चव्हाण यांची माहिती

सकाळवृत्तसेवा

मुंबई : खडकवासला येथील सिंहगड रस्ता, नांदेडपासून पानशेत आणि वेल्हापर्यंतच्या विविध रस्त्यांची कामे सुरू आहेत. किरकिटवाडी व खडकवासला येथील गावातील रस्त्याची लांबी ११८.७० किमीची असून, हायब्रीड ॲन्युटी अंतर्गत काम सुरू आहे. या रस्त्याचे काम 30 टक्के पूर्ण झाले असून, सप्टेंबर 2020 पर्यंत पूर्ण करण्यात येईल. ही कामे मुदतीत व गुणवत्तापूर्ण कामे न केल्यास कंत्राटदारावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभेत दिली.

खडकवासला येथील रस्त्यांच्या कामासंदर्भात आमदार भीमराव तापकीर यांनी संबंधित विभागाचे अधिकारी चुकीच्या माहितीच्या आधारे शासनाची दिशाभूल करीत असल्याने जर कंत्राटदार सांगत असलेल्या वेळेत काम पूर्ण करणार असेल तर त्याच्या पोशाख देऊन गौरव करू असा उच्चार केला आणि याप्रश्नी शासनाने गांभीर्याने लक्ष घालून दोषींवर कारवाईची मागणी केली. त्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. 

यावेळी झालेल्या चर्चेतील उपप्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याने वाहतूक वाहिन्या स्थलांतरीत करून काम करावे लागत असल्याने, गतीने काम करण्यास अडथळे निर्माण होत आहेत. वाहतुक सुरक्षेची उपाययोजना करून व वाहतूक नियंत्रित करणे पण आवश्यक असून, कामे गुणवत्ता राखून पुर्ण जलद गतीने करण्यात येणार असल्याची असून यामध्ये गैरप्रकार आढळल्यास कारवाई करू, अशी माहिती मंत्री भरणे यांनी दिली.

अशोक चव्हाण म्हणाले, किरकिटवाडी व खडकवासला या एकूण रस्त्याची लांबी ७६.१६ किमी पैकी २४.२२ किमी लांबीचे काम पूर्ण असून ११.४६ किमी लांबीत काम प्रगतीत आहे. गावांतील लांबी ही ११.७० किमी असून, त्यापैकी ३.६५ किमी लांबीतील काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम सप्टेंबर २०२० पर्यंत पूर्ण होणार आहे. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य माधुरी मिसाळ, संग्राम थोपटे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT