सोलापूर : इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याची पद्धत आता बदलली आहे. इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करणे बंद झाले आहे. सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा पारदर्शकपणे घेतली का, उत्तरपत्रिकांची तपासणी व गुणदान बिनचूक आहे की नाही?, याची पडताळणी आता ‘डायट’चे अधिकारी व शिक्षणाधिकारी करणार आहेत. त्यासाठी सर्व शाळांना पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका वर्षभर जनत करून ठेवाव्या लागणार आहेत.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून आता पाचवी व आठवीच्या परीक्षांवर लक्ष ठेवले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील शाळांमधील या इयत्तेतील विद्यार्थ्यांची पारदर्शकपणे परीक्षा घेतली जाते का?, याची पडताळणी प्राथमिक शिक्षणाधिकारी व जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्थेच्या (डाएट) माध्यमातून होणार आहे. काही दिवसांपूर्वी पाच ते १६ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसंदर्भातील अहवाल प्रसिद्ध झाला. त्यात इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना अंक ओळख, वजाबाकी, भागाकार देखील येत नसल्याची बाब समोर आली.
अनेकांना वाचायला देखील जमत नसल्याचे या सर्व्हेतून उघड झाले. दुसरीकडे सरकारी शाळांमधील प्रवेश देखील गुणवत्तेच्या कारणामुळे घटल्याची बाब स्पष्ट झाली. शाळांची गुणवत्ता वाढावी, विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या इयत्तेत पुढे जाताना त्यांच्या बौद्धिक पातळीचा विचार व्हावा, यासाठी आता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ढकलपास पद्धत करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांची परीक्षा पारदर्शकपणे घेण्याचे नियोजन ‘एससीईआरटी’कडून करण्यात आले आहे.
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी दोन संधी
इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना स्वतंत्र प्रश्नपत्रिका तयार करून दिल्या जातात. एप्रिलमध्ये या विद्यार्थ्यांची परीक्षा होईल. त्यात अनुत्तीर्ण झालेल्यांची पुढे मे-जून महिन्यात फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. याही परीक्षेत अनुत्तीर्ण झालेला विद्यार्थी त्याच वर्गात राहणार असून त्याला पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार नाही. त्यांची परीक्षा पारदर्शकपणे घेण्यात आली की नाही, याची पडताळणी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या आधारे केली जाणार आहे.
प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकांचे जपून ठेवाव्या लागतील
इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा प्रकार आता बंद झाला आहे. मागच्या वर्षी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या दोनअंकी आहे. आता इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा झाल्यावर त्यांची प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका शाळांनी जतन करून ठेवणे बंधनकारक आहे. त्या उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिकांची फेरतपासणी शिक्षणाधिकारी व जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्थेचे (डाएट) अधिकारी करतील. तसे आदेश त्यांना दिले आहेत.
- राहुल रेखावार, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.