ssc-hsc-students sakal media
महाराष्ट्र बातम्या

HSC, SSC Exam : दहा मिनिटे अगोदर मिळणार प्रश्‍नपत्रिका

4 मार्चपासून बारावीची तर 15 मार्चपासून दहावीची परीक्षा सुरु होत आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी 'शाळा तिथे केंद्र' असणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर वाचण्यासाठी दहा मिनिटे अगोदर प्रश्‍नपत्रिका दिली जाणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनाच्या संकटाचा सामना केल्यानंतर विद्यार्थ्यांना आता बोर्डाची परीक्षा द्यावी लागणार आहे. 4 मार्चपासून बारावीची तर 15 मार्चपासून दहावीची परीक्षा सुरु होत आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी 'शाळा तिथे केंद्र' असणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर वाचण्यासाठी दहा मिनिटे अगोदर प्रश्‍नपत्रिका दिली जाणार आहे.

जिल्ह्यात दहावी-बारावीचे जवळपास सव्वालाख विद्यार्थी आहेत. शाळेतील शिक्षकच या परीक्षेसाठी पर्यवेक्षक असणार आहेत. बैठे स्कॉड पथक म्हणून दुसऱ्या शाळेतील एक शिक्षक नियुक्‍त केला जाणार आहे. त्याचबरोबर माध्यमिक, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (डायट) प्राचार्य, उपशिक्षणाधिकारी यांची सहा भरारी पथकेही परीक्षांवर वॉच ठेवणार आहेत. परीक्षा काळात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी, तहसिलदार, गटविकास अधिकारी हेही काही परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी करतील. कोरोनाचे संकट पूर्णपणे संपलेले नसल्याने परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयी-सुविधा आहेत का, कोरोना नियमांचे तंतोतंत पालन होते की नाही, याची पडताळणी ते करतील. दरम्यान, कॉपीमुक्‍त अभियान राबविण्यासाठी त्या त्या गावातील शाळेवर (परीक्षा केंद्र) सरपंच व गावातील प्रतिष्ठीत नागरिकांची एक समिती नियुक्‍त केली जाईल. त्या समितीच्या माध्यमातून परीक्षा पारदर्शक पार पडावी, असा प्रयत्न होणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ज्यादा वेळ देण्यात आला आहे. 80 गुणांच्या पेपरसाठी साडेतीन तासांचा तर 40 गुणांचा पेपर सोडविण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ वाढीव मिळेल. परीक्षा देताना कोणताही विद्यार्थी मानसिक तणावाखाली नसेल, याची खबरदारी केंद्रप्रमुखांवर असणार आहे. तत्पूर्वी, परीक्षा सुरु होण्यापूर्वी अथवा पेपर सुटल्यानंतर विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही, याचीही जबाबदारी त्यांच्यावर सोपविल्याची माहिती शिक्षण विस्ताराधिकारी अशोक भांजे यांनी दिली.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 909 केंद्रे
माध्यमिक विभागाच्या जिल्ह्यात एकूण एक हजार 89 शाळा आहेत. त्यातील 85 शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांची पटसंख्या (दहावी अथवा बारावी) 15 पेक्षा कमी आहे. त्यामुळे त्या शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शेजारील केंद्र शाळेत परीक्षा द्यावी लागणार आहे. 15 अथवा त्याहून अधिक पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये परीक्षेची केंद्रे असतील. त्यानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 909 तर बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 358 परीक्षा केंद्रे असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJPचे संस्थापक काही संत नाहीत...; अभिजीत दिपके-सौरभ दासांबद्दल सोनम वांगचुकांचा मोठा दावा, काय म्हणाले?

Sangola Politics: सांगोला राजकारणात ‘बापू-आबा’च्या कानगोष्टींनी खळबळ; नव्या राजकीय समीकरणाची चर्चा जोरात

MSEB Short Circuit: महावितरणच्या डीपीतील शॉर्टसर्किटने १२ एकर ऊस भस्मसात; २५ लाखांचे नुकसान, शेतकरी आर्थिक संकटात

Pune Crime: प्रेमप्रकरणातील वादातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्या; प्रियकर अटकेत, खराडी पोलिसांत गुन्हा दाखल

North Cyprus Boat Accident : समुद्रात प्रवासी बोट उलटली; २७० जण बुडाल्याची भीती, दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT