rabies is now a notifiable disease in maharashtra  
महाराष्ट्र बातम्या

Rabies Disease News : जीवघेण्या रेबीज आजाराबाबत सरकारचा महत्वाचा निर्णय, आता डॉक्टरांना…

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागाने मंगळवारी रेबीज एक जीवघेणा विषाणूजन्य रोग आहे जो रेबीड अॅनिमल्स (rabid animals)(प्रामुख्याने कुत्रे) यांच्या चावल्याने पसरतो. हा नोटीफिएबल डिसीज (notifiable disease) म्हणजेच ज्याची सूचना सरकारी अधिकाऱ्यांना देणे कायद्याने आवश्यक असेल असा रोग असल्याची घोषणा सरकारने केली आहे.

त्यामुळे आता रेबीजचा संशयित रुग्ण दाखल झाल्यावर डॉक्टर आणि रुग्णालयांना त्याबद्दल आरोग्य विभागाला सूचित करावे लागेल. तसेच भौगोलिक क्षेत्रातून रेबीजचे प्रतिबंध, नियंत्रण आणि निर्मूलन केवळ योग्य देखरेख आणि डिसीज रिपोर्टींग सिस्टीमच्या मदतीने साध्य केली जाऊ शकते, असे मंगळवारी जारी केलेल्या राज्य सरकारच्या अधिसूचनेत म्हटले आहे.

भारतात रेबीजमुळे दरवर्षी 20,000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो, यामध्ये 60% प्रकरणे 15 वर्षाखालील मुलांमध्ये आढळतात. जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे की महाराष्ट्रात दरवर्षी किमान 200 रेबीज मृत्यू होतात, परंतु आरोग्य अधिकार्‍यांकडे फक्त 20 नोंदवले जातात.

हेही वाचा - भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

तर मुंबईत, कुत्रा चावण्याचे प्रमाण हे 2018 मध्ये 85,438 वरून 2021 मध्ये 61,332 पर्यंत कमी झाले आहे आणि गेल्या पाच वर्षात रेबीजने एकही मृत्यू झालेला नाही. 2030 पर्यंत रेबीजचे उच्चाटन करण्यासाठी जागतिक पातळीवर हालचाली सुरू आहेत, परंतु भारतात तो केवळ गोवा, अंदमान आणि सिक्कीममध्येच संपुष्टात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT