Rahul-Bajaj Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

राहुल बजाज यांना राजकीय वर्तुळातून श्रद्धांजली

प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचं आज निधन झालं.

सुधीर काकडे

भारतातील प्रसिध्द उद्यगोपती आणि बजाज समूहाचे अध्यक्ष राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचं आज निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. औद्योगिक क्षेत्रासह राजकारणात देखील त्यांचे चांगले संबंध होते. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

पद्मभूषण राहुल बजाज यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दु:ख झालं. ते आपल्या देशाने पाहिलेल्या प्रमुख उद्योगजगतातील नेतृत्वांपैकी एक होते. ते सर्वांसाठी प्रेरणादायी होते. आम्हाला त्यांची आणि त्यांच्या सुज्ञ सल्ल्याची नेहमी आठवण येईल. - खासदार सुप्रिया सुळे

जागतिक ख्यातीचे प्रतिष्ठित उद्योगपती, बजाज समुहाचे अध्यक्ष आणि देशभक्त राहुल बजाजजी यांच्या निधनाने खूप दुःख झाले. या कठीण प्रसंगी त्याच्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसोबत माझी प्रार्थना आहे. - वर्षा गायकवाड

राहुल बजाज यांच्या निधनाने देशातील उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो - रावसाहेब दानवे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री

राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 साली झाला होता. बजाज उद्योग (Bajaj Auto) समूहाला वाहन उद्योगात मोठे करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे. 2001 मध्ये राहुल बजाज यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राहुल बजाज यांचे अर्थशास्त्र आणि विधीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. राहुल बजाज यांची 1979-80 आणि 1999-2000 मध्ये दोनदा कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) चे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती.

शरद पवारांनी राहुल बजाज यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले. "पद्मभूषण श्री राहुल बजाज यांच्या दुःखद निधनाबद्दल कळल्यावर मला खूप धक्का बसला प्रख्यात स्वातंत्र्यसैनिक जमनालाल बजाज यांच्या नातवाने आपल्या दुचाकी तंत्रज्ञानाने समाजात विशेषतः गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांमध्ये परिवर्तन घडवून आणले - एक बजाज बाइक!" असे भावनिक ट्वीट शरद पवार यांनी केले आहे.

उद्योजक पद्मभूषण राहुल बजाज यांच्या निधनावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकुर यांनी ट्वीट केले आहे. "सुप्रसिद्ध उद्योजक पद्मभूषण राहुल बजाज यांचे आज दुःखद निधन झाले आहे. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बजाज उद्योग समुहाचे अध्यक्ष असलेल्या राहुल बजाज यांनी गेल्या पन्नास वर्षात बजाज उद्योग समूहाला नावारूपाला आणले. त्यांच्या अतुलनीय कर्तृत्वामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात बजाज ऑटो लिमिटेड या कंपनीने यशाचे शिखर गाठले.त्यांच्या जाण्यामुळे ऑटोमोबाईल उद्योगासह उद्योग जगतातील एक तारा व एक संवेदनशील व्यक्ती,अतिशय स्पष्टपणे आपली मते मांडणारा विचारवंत प्रसंगी सत्तेशी दोन हात करणारा योद्धा आपण गमावला आहे." असे त्या म्हणाल्या

उद्योजक पद्मभूषण राहुल बजाज यांचे अंत्यसंस्कार संपुर्ण शासकिय सन्मानाने करण्यात येणार अशी घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi ला संधीची वाट का पाहावी लागतेय? श्रेयस अय्यरने खरं कारण सांगितलं; म्हणाला, 'वेळ आली की तो राज्य करेल'

राहू येथे सलग दुसऱ्या दिवशी दुसरा बिबट्या जेरबंद; साडेचार वर्षांची मादी पिंजऱ्यात अडकल्याने नागरिकांमधे दहशत

Condom Company Stock: कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरचा धमाका; सहा महिन्यांत २५७% वाढ, गुंतवणूकदार मालामाल

भातपीकाचे आगार धोक्यात; राजगड तालुक्यातील बहुतांशी भात खाचरे कोरडी, शेतकरी चिंतेत

Latest Marathi News Live Update : पंजाबमध्ये माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT