Eknath Shinde Devendra Fadnavis
Eknath Shinde Devendra Fadnavis Sakal
महाराष्ट्र

CM Eknath Shinde News : राज्यभरात आम्ही 'सावरकर गौरव यात्रा' सुरू करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सकाळ डिजिटल टीम

CM Eknath Shinde News: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये केलेल्या सावरकरांच्या उल्लेखामुळे आता देशाचं वातावरण चांगलंच तापलं आहे.

महाराष्ट्रातही या वक्तव्याचे पडसाद दिसून येत आहे. राहुल गांधींचा निषेध आणि सावरकरांचा गौरव करण्यासाठी आता राज्यभरात यात्रा काढण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी केली आहे.

याबद्दल मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे यांनी राहुल गांधींचा निषेध केला आहे.

शिंदे म्हणाले, "राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला आहे. त्याबद्दल आता सगळा देश रस्त्यावर उतरला आहे. विधानसभेच्या प्रांगणातही आमच्या आमदारांनी याच्या निषेधार्थ आंदोलन केलं. राहुल गांधी यांच्याबाबत असलेली ती चिड आहे.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, "मी राहुल गांधी यांचा धिक्कार करतो. जनतेमध्ये या प्रकरणी तीव्र असंतोष आहे. म्हणूनच शिवसेना आणि भाजपा मिळून संपूर्ण राज्यभर सावरकर गौरव यात्रा आयोजित करत आहोत.

सावरकर यांच्या त्यागासाठी आणि देशभक्तीसाठी राज्यभरात, प्रत्येक जिल्ह्यात, विधानसभा क्षेत्रात ही यात्रा आम्ही सुरू करत आहोत. राहुल गांधी यांनी सावरकरांच्या वारंवार केलेल्या अपमानाचा आम्ही यामध्ये निषेध करू."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT