Maharashtra Election Commission and RahuI Gandhi  esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Election Commission: निवडणुकीत घोळ झाल्याच्या राहुल गांधींच्या आरोपावर, महाराष्ट्र निवडणूक आयोगाने पाठवलं पत्र अन् म्हटलं...

RahuI Gandhi Allegations: राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा बिहारमधील मतदार यादी पूनसर्वेक्षणावरून निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं आहे.

Mayur Ratnaparkhe

Maharashtra Election Commission letter to Rahul Gandhi: लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरूवारी पुन्हा एकदा बिहारमधील मतदार यादी पूनसर्वेक्षणावरून निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं आहे. तसेच, यावेळी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घोळ झाल्याचाही पुन्हा एकदा आरोप केला आहे. एवढंच नाहीतर अनेक निवडणुकीत एका व्यक्तीने तीन वेळा मतदान केल्याचंही त्यांनी म्हटलं. राहुल गांधींच्या या आरोपानंतर आता महाराष्ट्र निवडणूक आयोगाने त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

राहुल गांधी म्हणाले की, संविधानाची खरी ताकद म्हणजे मतदान आहे. पण निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धीनंतर योग्य व्यक्ती मतदान करते आहे का? अनेक मतदार यादीत बनावट मतदारांचा समावेश करण्यात आला का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित होतो आहे.

तर राहुल गांधींच्या या आरोपानंतर महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना पत्र लिहून मतदार नोंदणी नियम, १९६० च्या नियम २०(३)(ब) अंतर्गत संबंधित मतदारांच्या नावांसह स्वाक्षरी केलेले घोषणापत्र आणि शपथपत्र सादर करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून आवश्यक कार्यवाही सुरू करता येईल.

महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे. पत्रात असे म्हटले आहे की, "आज झालेल्या पत्रकार परिषदेत तुम्ही अपात्र मतदारांचा समावेश आणि पात्र मतदारांना मतदार यादीतून वगळण्याबद्दल उल्लेख केल्याचे कळले आहे. तुम्हाला विनंती आहे की अशा मतदारांच्या नावांसह संलग्न घोषणापत्र/प्रतिज्ञापत्र स्वाक्षरी केल्यानंतर परत पाठवावे, जेणेकरून आवश्यक कार्यवाही सुरू करता येईल."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT