Rahul Gandhi_Bharat Jodo Yatra 
महाराष्ट्र बातम्या

Bharat Jodo Yatra: राज्यातून गेलेल्या प्रकल्पांवर राहुल गांधींचं भाष्य; म्हणाले, तरुणांचं भविष्य...

भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात असून नांदेडमध्ये राहुल गांधींची सभा पार पडली.

सकाळ डिजिटल टीम

नांदेड : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखील भारत जोडो यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही यात्रा सध्या महाराष्ट्रात आली असून नादेड इथं राहुल गांधींची सभा पार पडली. यावेळी त्यांनी राज्यातून गुजरातमध्ये गेलेल्या प्रकल्पांवर भाष्य केलं. (Rahul Gandhi said that reason behind travel on foot at Bharat Jodo Yatra)

राहुल गांधी म्हणाले, "पाच सहा वर्षे झाले, त्याचे पुरावे तुमच्या समोर आहेत, काळा पैसा संपला का? काळा पैसा तर वेगळा मुद्दा पण तुमचे प्रकल्पही जात आहेत, ते ही गुजरातमध्ये. जसं विमान रनवेवरुन टेकऑफ करतं त्याप्रमाणं एअरबसचा प्रकल्प महाराष्ट्रातून उडून गेला. कळलं नाही कुठे गेला? कुठे गेला? आणि का गेला? गुजरातमध्ये निवडणूक आली आहे. महाराष्ट्रातलं जे तुमचं आहे, तो एअरबस गेला, त्यानंतर फॉक्सकॉनचा प्रकल्प गेला, हजारो करोडो रुपयांचं सोडा पण यामुळं तुमच्या तरुणांचं भविष्य, त्यांचा रोजगार तुमच्या राज्यातून हिसकावून घेण्यात येत आहे"

"शेतकरी आणि कामगारांचा भारत हा वाहनांमधून प्रवास करत नाही तर तो रस्त्यावर चालतो. त्यांना विमान, हेलिकॉप्टर्स किंवा वाहनं कळत नाहीत. जर तुम्हाला हे समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला रस्त्यावर चालावं लागेल," अशा शब्दांत भारत जोडो यात्रा काढण्यामागील कारण त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, परवा ७ नोव्हेंबरला रात्री भारत जोडो यात्रेनं महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात प्रवेश केला. हाती माशाली घेत या यात्रेत सर्व समर्थक सहभागी झाले होते. या यात्रेमुळं काँग्रेस नेत्यांमध्ये एक प्रकारचा विश्वास दिसून आला. पुढील पंधरा दिवस ही यात्रा महाराष्ट्रातल्या विविध भागातून जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT