Rahul Gandhi writes letter to sanjay raut
Rahul Gandhi writes letter to sanjay raut 
महाराष्ट्र

पत्रकार परिषदेनंतर राहुल गांधींचं राऊतांना पत्र, म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण तापलंय. एकीकडे अधिवेशात गौप्यस्फोटांची मालिका सुरू आहे. तर दुसरीकडे आयकर विभागाच्या छापासत्रांनी महाविकास आघाडीतील नेते आणि त्यांच्या निकटवर्तीयांना जेरीस आणलंय. यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केंद्रीय संघटनांवर मोठे आरोप केले आहेत. (Sanjay Raut Slams IT over raids in Maharashtra)

देशात ईडीनंतर आयकर विभागाची भानामती सुरू असल्याचा घाणाघात त्यांनी केला. राऊत यांच्या पत्रकार परिषदेआधीच सकाळी आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांच्या निकटवकर्तीयांवर छापे पडले आणि घडामोडींना वेग आला. पत्रकार परिषदेत राऊत यांनी भाजपवर आरोप केले. यानंतर आता राहुल गांधी यांनी राऊतांना पत्र लिहून मी तुमच्या पाठिशी असल्याचं सांगितलंय. (Rahul Gandhi Writes Letter to Sanjay Raut)

ईडी म्हणजे भाजपची एटीएम मशीन असून, ईडीने आतापर्यंत सर्वात जास्त धाडी महाराष्ट्रात टाकल्या आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला. यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संजय राऊत यांना पत्र पाठवलंय. काँग्रेस पक्ष तुमच्या पाठिशी उभा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय तपास यंत्रणा टार्गेट करत आहेत. यातून मोदी सरकार विरोधकांना गप्प करत असल्याचं स्पष्ट झालंय असं राहुल गांधी यांनी म्हटलंय.

काँग्रेस पक्ष तुमच्या पाठिशी असून कोणतीही भीती बाळगण्याचं कारण नाही. काँग्रेसच्या वतीने मी तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पाठिंबा दर्शवत आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

हे पत्र संजय राऊत यांनी ट्विटरवर शेअर केलंय. लोकशाही मूल्ये आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्याच्या प्रयत्नांमध्ये आपल्याला एकत्र लढावं लागेल. केंद्रीय तपास यंत्रणा एका पक्षाच्या गुलामाप्रमाणे वागत आहेत. आणि हे हे फक्त दुर्दैवी नाही तर धोकादायकही आहे, असं ते म्हणाले.

राहुल गांधींचं पत्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला; फुलांचा हार घालायला आला अन्...; व्हिडिओ व्हायरल

MI vs LSG Live Score IPL 2024 : केएलच्या संथ फलंदाजीवर निकोलसचा आक्रमक उतारा; मुंबईसमोर ठेवलं 215 धावांचे आव्हान

Uddhav Thackeray: "4 जूननंतर देश डि'मोदी'नेशन करणार, शिवाजी पार्कवर शेवटचं..."; ठाकरेंचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray: मोदीजी हिंमत असेल तर संपवण्याचा प्रयत्न करुन बघा...; उद्धव ठाकरेंचं थेट आव्हान

Latest Marathi News Live Update: मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाची तोडफोड?

SCROLL FOR NEXT