Rahul Gandhi  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Rahul Gandhi : 'भारत जोडो'च्या यशानंतर राहुल गांधींची महाराष्ट्रात पदयात्रा

संतोष कानडे

नवी दिल्लीः राहुल गांधी यांनी मागील वर्षी भारत जोडो यात्रा केली होती. या यात्रेच्या माध्यमातून त्यांनी देशातल्या प्रत्येक राज्यात पायी जात जनतेशी थेट संवाद साधला होता. राजकीय जाणकारांच्या मते या यात्रेचं फलित कर्नाटक विधानसभा निवडणुकीतून काँग्रेसला मिळालं. आता राहुल गांधी महाराष्ट्रात यात्रा करणार आहेत.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज याबाबत माध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघामध्ये प्रभारी नेमले आहेत. ते लोकसभा संघात दोन दिवस राहून आता परिस्थिती काय आहे, याचा अहवाल देतील. 15 ऑगस्ट पर्यंत ते अहवाल देतील आणि 16 ऑगस्ट रोजी बैठक होईल त्यात चर्चा होईल. त्यानंतर राज्यात पदयात्रा काढणार असल्याचं पटोलेंनी स्पष्ट केलं.

नाना पटोले पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांची यात्रा सुरू होणार असून आम्ही सहा विभागात जाणार आहोत. पूर्व विदर्भाची जबाबदारी माझ्यावर, पश्चिम विदर्भाची जबाबदारी विजय वडेट्टीवार यांच्याकडे असेल तर पश्चिम महाराष्ट्र पृथ्वीराज चव्हाण, मराठवाडा अशोक चव्हाण, उत्तर महाराष्ट्र बाळासाहेब थोरात यांच्याकडे असेल. कोकणात सगळे नेते जाणार असल्याचं पटोलेंनी स्पष्ट केलं.

पुढे बोलताना पटोले म्हणाले, 31 ऑगस्टपर्यंत पदयात्रा संपणार असून त्यानंतर बसमधून पोलखोल यात्रा होणार आहे. यादरम्यान वज्रमूठ सभादेखील होतील. पोलखोल यात्रा ही बसमधून होणार असून त्याचा रुट जाहीर करणार असल्याचं पटोलेंनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devkund Waterfall: देवकुंड धबधब्यात पुण्यातील दोन पर्यटक बुडाले; सोमवारी सकाळी शोधकार्य सुरु होणार

Abhishek Sharma: भारत हरला, पण अभिषेक शर्माने रचला इतिहास! 'हा' खास विक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच क्रिकेटपटू

Top gaining stocks list: शेअर बाजार कोसळला तरी 'या' 5 शेअर्सनी दिले बंपर रिटर्न! फक्त पाच दिवसांमध्ये 47 टक्क्यांपर्यंत धावले

'लॉक अप' सोडताच सुनीता आहुजांचा मोठा खुलासा; म्हणाल्या, 'रिअ‍ॅलिटी' शब्दाचाच तिटकारा आलाय'

Premature Grey Hair Causes: कमी वयात केस पांढरे होतायत? फक्त ताण नाही, 'हे' ५ आजारही असू शकतात कारण

SCROLL FOR NEXT