Sanjay Raut 
महाराष्ट्र बातम्या

Rahul Kul: राहुल कुल यांना क्लीनचीट, राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, दौंड कार्टानं...

दौंड कोर्टाचा हवाला देत राऊतांनी फडणवीसांना टार्गेट केलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : आमदार राहुल कुल यांच्या कथित साखर कारखाना घोटाळाप्रकरणी राज्य सरकारनं त्यांना आज क्लीनचीट दिली. या प्रकरणाचे पुरावे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं सुपूर्द केले होते, त्यामुळं क्लीनचीटनंतर राऊत यांनी संताप व्यक्त केला असून फडणवीसांवर निशाणा साधला आहे. (Rahul Kul clean cheat by Govt Sanjay Raut attack on Devendra Fadnavis)

राऊत म्हणाले, "स्वतःच्या लोकांना धुऊन काढायचं, क्लीनचीट द्यायची हा यांचा जुना उद्योग आहे. मी सर्व पुरावे गृहमंत्र्यांकडे पाठवले आहेत. पण सर्व चौकशी समित्या यांच्याच आहेत. पण काल दौंड कोर्टानं नामदेवराव ताकवणे यांच्या तक्रारीनुसार सीआरपीसी २०२ नुसार कारखान्याचे चेअरमन, व्हाईसचेअरमन, लेखापरिक्षक यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यात तथ्य असल्याशिवाय कोर्ट असे आदेश देणार नाही"

गृहमंत्र्यांना या प्रकरणाची पूर्ण माहिती नाही

"यातील जे घोटाळे आहेत त्याची सविस्तर माहिती मी आधी गृहमंत्र्यांकडं दिली. त्यानंतर सीबीआयकडे आणि ईडीकडं पाठवली आहे. पण ज्या अर्थे यांना क्लीनचीट दिली जात असेल तर आम्ही जे आरोप करतो की भाजप हे गुन्हेगारांचे गुन्हे धुऊन काढणारं 'वॉशिंग मशिन' आहे ते खरंच आहे.

गृहमंत्र्यांनाच हा विषय पूर्ण माहिती नाही. त्यांना केवळ हेच माहिती आहे की, भ्रष्टाचार करणारा आपल्या पक्षातला माणूस आहे आणि आपण त्याला वाचवलं पाहिजे," अशा शब्दांत राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

आमचं सरकार आल्यावर कारवाई

ही अत्यंत गंभीर बाब आहे. या कारखान्याचे जे शेतकरी सभासद आहेत त्यांच्याशी बोला. यामध्ये शेतकऱ्यांचे ५०० कोटी रुपये थेटपणे चोरलेले आहेत, आणि आता सरकार यांना क्लीनचीट देत आहे. उद्या आमचं सरकार येईल तेव्हा त्यांच्यावर आम्ही कारवाई करु, अशा शब्दांत राऊतांनी इशाराही दिला.

विखेंना झाकीर नाईकनं पैसा पुरवला

दादा भुसे यांनी १७८ कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. अब्दुल सत्तार, राधाकृष्ण विखे पाटील हे देखील मनी लाँड्रिंगमध्ये अडकलेले आहेत. विखे पाटलांच्या संस्थेला फरार इस्लामिक स्कॉलर झाकीर नाईककडून साडे चार कोटी रुपये मिळाले आहेत.

हाच गुन्हा इक्बाल मिर्ची, दाऊद इब्राहिम यांच्याकडून काही व्यवहार झाल्यानं नवाब मलिक आता तुरुंगात आहेत. मग झाकिर नाईक याच्याकडून पैसे मिळालेले लोक मंत्रिमंडळात कसे? स्वतः विखे सांगतात की आम्हाला चार कोटी नाही अडीच कोटीच मिळाले आहेत, म्हणजे हे सत्य आहे, अशा शब्दांत राऊतांनी विखेंनाही टार्गेट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT