Rahul Narvekar On Shivsena Mla Disqualification Case Esakal
महाराष्ट्र बातम्या

Rahul Narvekar On Shivsena Mla Disqualification Case: '...तोपर्यंत सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही', नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 8 जुलै रोजी शिवसेनेच्या 40 आमदारांसह ठाकरे गटाच्या 14 आमदारांनाही नोटीस बजावली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

शिवसेनेच्या 40 आमदारांना आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना अपात्रतेबाबत म्हणणं मांडण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. अपात्रतेविरोधातील कारवाई टाळण्यासाठी आमदारांना सर्व पुरावे सादर करावे लागणार असल्याची माहीती आहे. सध्या तो विषय चर्चेत असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.(Latest Marathi News)

विधानसभा अध्यक्ष मनमानी किंवा घटनाबाह्य कृती करत नाहीत, तोपर्यंत सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, असं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर बोलताना हे वक्तव्य केलं आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 8 जुलै रोजी शिवसेनेच्या 40 आमदारांना नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर ठाकरे गटाच्या 14 आमदारांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. या आमदारांना त्यांनी आपली बाजू मांडण्यासाठी 7 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नार्वेकरांनी यांना हे वक्तव्य केलं आहे.(Latest Marathi News)

तर राहुल नार्वेकर पुढे बोलताना म्हणाले की, भारतीय संविधानाने कायदेमंडळ व न्यायपालिकेचे अधिकार व कार्यक्षेत्र निश्चित करुन दिलेले आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष मनमानी किंवा घटनाबाह्य कृती करत नाहीत, तोपर्यंत याविषयात सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही. तूर्त आता आमदारांना अपात्रतेच्या मुद्यावर नोटीसा पाठवल्या आहेत. त्यावर त्यांची बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळही देण्यात आला आहे.

अपात्रतेसंबंधीच्या प्रत्येक याचिकेवर सुनावणी घेऊन निर्णय देण्यासाठी वेळ लागेल. त्यामुळे न्यायालय आपल्याला एका विशिष्ट कालावधीत हा मुद्दा निकाली काढण्यास सांगेल,असे वाटत नाही, असंही नार्वेकर यावेळी बोलताना म्हणाले आहेत.(Latest Marathi News)

सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेविषयी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP जॉइन करा अन् दर महिन्याला 50 हजार कमवा! असा मेसेज सगळीकडे का होतोय व्हायरल? यामागचा स्कॅम पाहून बसेल धक्का

Pune Riksha Fare: पुणेकरांना मोठा झटका! रिक्षाभाडेवाढीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात; लवकरच नवे दर हाेणार लागू

Almatti Dam Controversy : आलमट्टीच्या उंचीवरून कर्नाटकची मनमानी! महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात जावे; तज्ज्ञांचं आवाहन, काय म्हणाले केंगार?

Latest Marathi News Live Update : पंढरपूरच्या वारीवरून परतताना काळाचा घाला! ३ वाहनांचा भीषण अपघात

Child Murder Case: एआयच्या मदतीने चिमुकल्याची हत्या! बिश्नोई गँगच्या नावाने १९९ रुपयांत सिमकार्ड खरेदी; कसा रचला भयानक कट?

SCROLL FOR NEXT