Rahul Narvekar On Shivsena Mla Disqualification Case Esakal
महाराष्ट्र बातम्या

एका आठवड्यात आपलं म्हणणं सादर करा, विधानसभा अध्यक्षांचे शिंदे-ठाकरे गटाला आदेश

Sandip Kapde

Rahul Narvekar On Shivsena Mla Disqualification Case

ठाकरे गट आणि शिंदे गट आमदार अपात्र प्रकरणात विधानसभा अध्यक्ष सुनावणी घेत आहेत. दरम्यान एका आठवड्यात आपलं म्हणणं सादर करा, असे आदेश  विधानसभा अध्यक्षांनी शिंदे आणि ठाकरे गटाला दिले आहेत. त्यामुळे याप्रकरणी आता दोन आठवड्यांनी सुनावणी होणार आहे.

ठाकरे आणि शिंदे गटाला एक आठवड्यात एकमेकांना कागदपत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोन आठवड्यानंतर या प्रकरणी सुनावणी होईल, असा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी प्रतोद आणि व्हीप प्रकरणावर दिला. याप्रकरणी सुनिल प्रभु यांनी याचिका दाखल केली आहे.

ठाकरे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. सुरुवातीला देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. विधानसभा अध्यक्षांनी सुरुवातीला देवदत्त कामत यांच्या माध्यमातून ठाकरे गटाच्या आमदारांची बाजू ऐकून घेतली.

आज नेमका काय युक्तिवाद झाला?

पहिला युक्तिवाद हा सुनिल प्रभू यांनी दाखल केलेल्या व्हिप नेमका कोणाचा यावर झाला. दोन्ही गटाने युक्तिवाद केला. ठाकरे गटाकडून देवदत्त कामत तर एकनाथ शिंदे यांच्याकडून अनिल सिंह साखरे यांनी युक्तिवाद केला. अनिल सिंह साखरे यांनी आम्हांला कागदपत्रे मिळाली नाहीत असा युक्तिवाद केला. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटाला आप आपले कागदपत्रे एका आठवड्यात एकमेकांना सादर करण्याचे आदेश दिलेत. त्यानंतर पुढील सुनावणी या प्रकरणी दोन आठवड्यात सुनावणी होईल.

शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे म्हणाले, अनिल सिंघ यांनी बाजू मांडली. दोन्ही गटा एका आठवड्यात म्हणण मांडणार आहेत. लवकरात लवकर निर्णय व्हायला पाहिजे. दोन्ही गटाला एका आठवड्याचा वेळ देण्यात आला आहे. (Latest Marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Election Akhilesh Yadav: उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध; भाजपला टक्कर देण्यासाठी 'हे' मुद्दे घेऊन मैदानात

Onion Rate: कांद्याचे भाव घसरले! 9 दिवसांत 1,800 रुपयांची घसरण; लासलगावमध्ये आजचा दर किती?

आनंद... ज्याचा त्याचा! ; जुन्या क्रिकेट मासिकांतील दुर्मिळ लेख, छायाचित्रे आणि दिग्गज खेळाडूंच्या आठवणी जतन करण्याचा अनोखा आनंद

INDIA PAVILION AWARD: व्हेनिस आर्ट बिएनालेमध्ये भारताचा डंका! 'बेस्ट नॅशनल पॅव्हेलियन' पुरस्कार; काय आहे खास? जाणून घ्या

IND vs NZ 2nd Test Weather Update: भारत-न्यूझीलंड मॅच पाहण्यासाठी पहाटे उठण्यापूर्वी हे नक्की वाचा... Christchurch मधून Live अपडेट्स; नेमकं काय घडणार?

SCROLL FOR NEXT