Rahul Narvekar On Shivsena MLA Disqualification Hearing during Maharashtra Winter Session 2023  
महाराष्ट्र बातम्या

MLA Disqualification Hearing : नार्वेकर करणार 'ओव्हरटाईम'; हिवाळी अधिवेशनादरम्यान देखील सुरू राहणार आमदार अपात्रता सुनावणी

रोहित कणसे

महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू होत आहे. या हिवाळी अधिवेशनात राज्यातील वेगवेगळ्या मुद्द्यांवर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या अवकाळी पाऊस, पीकविमा, मराठा आणि धनगर यांच्या आरक्षणाचा मुद्दा यासारखे अनेक मुद्दे ऐरणीवर आहेत. या सर्व मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. दरम्यान या अधिवेशनासोबत विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू असलेली शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची सुनावणी देखील सुरूच राहणार आहे.

दरम्यान अधिवेशन काळात देखील ही शिवसेना आमदार अपात्रतेच्या याचिकांवरील सुनावणी सुरूच राहणार असून विधानसभा अध्यश्र या सुनावणीसाठी ओव्हरटाईम काम करणार आहेत. याबद्दल खुद्द विधाससभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माहिती दिली आहे.

राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन आज पासून सुरू होत आहे, हे अधिवेशन राज्याच्या गोरगरीब जनतेसाठी अत्यंत उपयोगी ठरेल. तसेच सर्व प्रश्नावर चर्चा होईल अशी अपेक्षा आहे, असे राहुल नार्वेकर म्हणाले.

अधिवेशनात पूर्ण वेळ देऊन महत्वपूर्ण बाबी असतील त्यावर मी लक्ष देईन. प्रत्येक दिवसाचे कामकाज बघून आम्ही सुनावणी घेण्यात येईल असे नार्वेकर म्हणाले.

अपात्रतेच्या याचिकांवरील निकाल लवकरात लवकर द्यावा माझा प्रयत्न आहे. त्याकरिता जास्तीत-जास्त सिटींग्ज घेऊन निकाल देण्याचा प्रयत्न आहे. अधिवेशनही महत्वाचं आहे, त्यासाठी पूर्ण वेळ देणं आवश्यक आहे, त्यामुळे उशिरा संध्याकाळपर्यंत बसून सुनावण्या घेऊन यावर निकाल देण्याची कारवाई करण्यात येईल असेही विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले.

सगळं मॅनेज करणं चॅलेंजिंग टास्क आहे. अधिवेशनात पूर्ण वेळ देऊन संध्याकळी पाच वाजल्यापासून उशिरा रात्री नऊ वाजेपर्यंत सुनावणी घेऊ.त्यामुळे माझा कामाचा दिवस साधारण बारा ते तेरा तासांचा असेल असेही नार्वेकर यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

SCROLL FOR NEXT