maharashtra politics crisis Sanjay Raut Arrest Uddhav Thackeray meet rauts family esakal
महाराष्ट्र बातम्या

Bail Approved: राहुल शेवाळे बदनामी प्रकरण; उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना कोर्टाकडून जामीन मंजूर

सकाळ डिजिटल टीम

Uddhav Thackeray Sanjay Raut court bail approved

मुंबई- राहुल शेवाळे बदनामी प्रकरणात ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना माझगाव कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. १५ हजारांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला आहे. संजय राऊत हे कोर्टात उपस्थित होते. माझगाव कोर्टाने हा जामीन मंजूर केलाय. १४ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

उद्धव ठाकरे यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणीसाठी हजर होते. उद्धव ठाकरे यांच्या वतीने त्यांच्या वकीलांनी कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. राहुल शेवाळे यांनी केलेले आरोप मान्य आहेत का, अशी विचारणा कोर्टाने केली होती. यावर उद्धव ठाकरे यांनी आरोप मान्य नसल्याचे म्हटले.

सामना मुखपत्रामध्ये माझ्याविरोधात बदनामीकारक मजकूर छापून आलाय, असा आरोप करत राहुल शेवाळे यांनी कोर्टामध्ये धाव घेतली होती. याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल नसून प्रकरण कोर्टात आहे. माझगाव कोर्टाच्या निर्णयामुळे तुर्तास उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना दिलासा मिळालाय.

सामना मुखपत्रामध्ये माझी बदनामी करण्यात आलीये, असं म्हणत राहुल शेवाळे यांनी मानहाणीचा दावा ठोकला होता. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी माफी मागावी, अशी त्यांनी मागणी केली होती. कोर्टात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी राहुल शेवाळे यांनी केलेले आरोप मान्य केलेले नाहीत. तुर्तास माझगाव कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केलाय. पुढील सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष असेल. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT