Central Railway esakal
महाराष्ट्र बातम्या

Railway News: रेल्वे पोलिसांनी २४० किलो चांदी केली जप्त; वाचा नक्की काय आहे प्रकरण

सकाळ डिजिटल टीम

Railway News: पश्चिम रेल्वेच्या दक्षता विभागाने हापा-मुंबई सेंट्रल दुरंतो एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत २४० किलो वजनाच्या चांदीच्या दागिन्यांने जप्त केले आहे.जास्त पार्सल शुल्क भरू नये म्हणून चांदी ऐवजी नकली दागिने दाखवून पार्सल वाहतूक सुरु होती.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, दक्षता आणि आरपीएफच्या पथकाने चांदीच्या मौल्यवान दागिन्यांसह पार्सल पॅकेजचे ६ बंडल जप्त केले. हे बंडल २६ डिसेंबर रोजी हापा-मुंबई सेंट्रल दुरंतो येथून मुंबई सेंट्रल स्थानकावर उतरवण्यात आले आणि डिलिव्हरी न घेता रेल्वेच्या आवारातून बाहेर नेण्यात आले. दक्षता पथकाने पार्सलच्या डब्यासमोर पार्सल खेप उतरवण्यावर लक्ष ठेवले. तेव्हा काहीही अनुचित आढळले नाही.

परंतु मागील पार्सल डब्यात अनलोडिंगवर देखरेख करणार्‍या कर्मचार्‍यांची चौकशी केली असता काही पॅकेजेस डिलिव्हरीसाठी आवक गोदामात हस्तांतरित करणे बाकी असल्याचे समोर आले. यावेळी दक्षता आणि आरपीएफ पोलिसांचे पथक ट्रक टेम्पो लोडिंगच्या आवारात पोहोचला आणि लोडरला पार्सलच्या मालासह पकडून पार्सल गोदामात आणले.

यावेळी चौकशी केली असता ६ बंडल नकली दागिने म्हणून बुक केले गेले होते. १३४५ रुपये भरले गेले. एका तज्ञाने देखील पडताळणी केली ते बंडल २४० किलो वजनाच्या चांदीच्या दागिन्यांनी भरलेले होते आणि त्यांची किंमत अंदाजे १. ३४ कोटी रुपये होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मोनोरेल बंद, मेट्रोतही तांत्रिक बिघाड; घाटकोपर रेल्वे स्थानकावर उसळली प्रवाशांची गर्दी

'त्या घटनेनंतर मी खूप रडलो होतो' अभिनेता राजकुमार राव स्पष्टच बोलला, म्हणाला, 'आम्हाला काय भावना नाहीत का?'

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Cyber Security : जगभरात चक्क १६ अब्ज पासवर्ड झाले लीक; भारत सरकारने दिला इशारा, तुमचं अकाऊंट सुरक्षित करा एका क्लिकवर..

Beed : कर्ज फेड नाहीतर पत्नीला माझ्या घरी सोड, सावकाराच्या जाचाने दुकानदाराची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिलं, वर्गणी काढून क्रियाकर्म करा

SCROLL FOR NEXT