dr. Babasaheb aambedkar sakal
महाराष्ट्र बातम्या

रेल्वेकडून डॉ. बाबासाहेबांच्या पाऊलखुणांचा शोध! कुर्डुवाडी स्थानकावर झळकणार १९३७ मधील छायाचित्र; डॉ. बाबासाहेब सोलापुरात कधी कधी आले होते? वाचा...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ३१ डिसेंबर १९३७ रोजी पंढरपूरला जाण्यासाठी कुर्डुवाडी स्थानकावर आले होते. त्यांच्या स्वागत समारंभाच्या छायाचित्राची फ्रेम रेल्वे विभागाने तयार केली असून कुर्डुवाडी रेल्वे स्थानकाच्या मुख्य कार्यालयात ती आता झळकणार आहे. जिल्ह्यातील इतर अशाच छायाचित्रांचा शोध रेल्वे विभाग घेत आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ३१ डिसेंबर १९३७ रोजी पंढरपूरला जाण्यासाठी कुर्डुवाडी स्थानकावर आले होते. त्यांच्या स्वागत समारंभाच्या छायाचित्राची फ्रेम रेल्वे विभागाने तयार केली असून कुर्डुवाडी रेल्वे स्थानकाच्या मुख्य कार्यालयात ती आता झळकणार आहे. जिल्ह्यातील इतर अशाच छायाचित्रांचा शोध रेल्वे विभाग घेत आहे.

रेल्वेचे विभागीय वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी कुर्डुवाडी स्थानकातील स्टेशन मास्तरच्या दालनात लावण्यासाठी १९३७ मधील छायाचित्रापासून फ्रेम तयार केली आहे. ३१ डिसेंबर १९३७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पंढरपूर येथे जाण्यासाठी कुर्डुवाडी स्थानकावर आले होते. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते. या प्रसंगाचे हे छायाचित्र आहे. लवकरच ही फ्रेम कुर्डुवाडी स्थानकावर झळकणार आहे. अशाच आणखी काही पाऊलखुणांचा शोध घेऊन रेल्वे प्रशासन अशी छायाचित्रे विविध ठिकाणाच्या कार्यालयात लावण्यासाठी तयार करणार असल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब सोलापुरात आले होते मद्रास मेलने

१९४६ मध्ये सोलापूर म्युनिसिपल जिल्हा लोक बोर्डाच्या वतीने हरिभाई देवकरण प्रशालेच्या कै. रा. ब. मुळे सभागृहात डॉ. बाबासाहेबांना मानपत्र देण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी बॅकवर्ड हॉस्टेलला भेट दिली. तेथे मोकळ्या मैदानात बाबासाहेबांचे भाषण झाले. याशिवाय विद्यार्थिनी आणि स्त्री शिक्षकांचा मेळावा याठिकाणी आयोजित केला होता. त्यासाठी ते मुंबई मद्रास मेल सकाळी ८ वाजता सोलापूरला आले होते. १४ जानेवारी १९४६ रोजी रेल्वे स्टेशन परिसरात गर्दी झाली होती.

डॉ. बाबासाहेबांच्या आठवणी...

  • १९२४, १९२७, १९३७ आणि १९४६ या वर्षांमध्ये आले होते डॉ. आंबेडकर सोलापूर शहरात

  • १९१४ मध्ये डॉ. आंबेडकर बार्शी येथे प्रथम केला होता धर्मांतराचा उच्चार

  • कसबे तडवळे येथे २२, २३ फेब्रुवारी १९४१ रोजी घेतली होती महार-मांग-वतनदार परिषद

  • १४ जानेवारी १९४६ मध्ये सोलापूरमध्ये झाला होता भव्य नागरी सत्कार

  • २४ जानेवारी १९३७ वळसंग येथील विहिरीचे केले होते उद्‌घाटन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Opening: शेअर बाजाराची सपाट सुरुवात; सेन्सेक्स 37 अंकांनी वाढला, कोणते शेअर्स तेजीत?

Nagpur : माजी नगरसेवकाच्या मुलाला ड्रग्ज विकताना अटक; बॉडी बिल्डिंगमध्ये चॅम्पियन अन् जिम ट्रेनर, भाजपशी कनेक्शन

Pune Cafe Goodluck News : सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल अन् पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेला टाळे, नेमकं काय घडलं?

Success Story: 'सात वेळा अपयशानंतर आठव्या परीक्षेत यशाला गवसणी'; डोणजतील टोपण्णा नाईकची मंत्रालय महसूल साहायकपदी वर्णी

IRCTC Malaysia and Singapore Tour: मग IRCTC च्या भन्नाट टूर पॅकेजचा आनंद घ्या!

SCROLL FOR NEXT