महाराष्ट्र बातम्या

राज्यात पुढील तीन दिवस पाऊस; हवामान खात्याचा अंदाज

सकाळवृत्तसेवा

पुणे : कडाक्याचा उन्हाळा जाणवत असताना राज्यात पुढील तीन दिवस मध्यम ते जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सध्या राज्यात वाहणाऱ्या चक्राकार वाऱ्यांमुळे पावसाला पोषक असे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील तुरळक भागांमध्ये मेघागर्जनांसह पाऊस पडेल असे हवामान विभागाने नमूद केले आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तुरळक भागांमध्ये बुधवारी (ता. 29) विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज मंगळवारी (ता.28) हवामान विभागाने दिला. दरम्यान पावसाबरोबर सोसाट्याच्या वारे वाहतील असे ही सांगण्यात आले आहे. तर राज्यातील बहुतांश भागांमध्ये दुपारनंतर पावसाच्या सरी बरसतील. मात्र, त्यानंतर राज्यातील कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मंगळवारी राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान जळगाव येथे 41. 2 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. तसेच राज्यातील तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. 

शहरात सुद्धा ढगाळ वातावरण 

पुणेकरांना पुढील तीन दिवस दुपारपर्यंत उन्हाचे चटके तर सायंकाळी ढगाळ व हलका पाऊस अनुभवायला मिळणार आहे. शहर आणि परिसरात बुधवार ते शुक्रवार ढगाळ वातावरणाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचबरोबर हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

मंगळवारी शहर व परिसरातील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 22.3 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. तसेच शुक्रवारपर्यंत शहर व परिसरातील कमाल तापमान 40 अंश आणि किमान तापमान 22 अंश सेल्सिअसच्या जवळपास असेल. तर रविवारनंतर (ता. 3 मे) शहरातील वातावरण कोरडे राहणार असल्याचा अंदाजा हवामान खात्याने दिला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

शहर व परिसरात येत्या शुक्रवापर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. दरम्यान यावेळी 30 ते 40 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने वारे वाहतील. तसेच शहरातील तुरळक भागांमध्ये दुपारनंतर सोसाट्याच्या वाऱ्यांसह हलका पाऊस पडू शकतो.

- अनुपम काशयपी, हवामानशास्त्रज्ञ - भारतीय हवामान विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : तुळजापूरमध्ये पोलिस आणि भाविकांमध्ये वाद

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT