Koyna Dam esakal
महाराष्ट्र बातम्या

Koyna Dam Update : कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम; 'इतके' टक्के भरले धरण, महाबळेश्‍वरातही संततधार

कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस पडत आहे.

सकाळ डिजिटल टीम

जलाशयात प्रतिसेकंद पाच हजार क्युसेक पाण्याची आवक वाढली असून, आज प्रतिसेकंद १२ हजार ४७६ क्युसेक नोंदली गेली आहे.

पाटण : कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस पडत आहे. काल दिवसभर पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे कोयना धरण २५ टक्के भरले आहे.

कोयनानगरला पावसाचा जोर कमी असला तरी नवजा व महाबळेश्‍वर (Mahabaleshwar) परिसरात संततधार सुरू आहे. त्यामुळे गेल्या २४ तासांत कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात एक टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.

रात्रीपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पावसाच्या सरी पडत होत्या. काल दिवसभर तीच स्थिती होती. गेल्या २४ तासांत कोयनानगर येथे ६८ (१०९४) मिलिमीटर, नवजाला ९७ (१५८६) मिलिमीटर आणि महाबळेश्‍वरला ९१ (१५७१) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जलाशयात प्रतिसेकंद पाच हजार क्युसेक पाण्याची आवक वाढली असून, आज प्रतिसेकंद १२ हजार ४७६ क्युसेक नोंदली गेली आहे. २४ तासांत एक टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. एकूण पाणीसाठा २६.१६ टीएमसी झाला असून, पाणीपातळी २०६९ फूट झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nurse Strike: राज्यातील परिचारिकांचा संप, मागण्या मान्य न झाल्यास 'या' तारखेपासून राज्यव्यापी निषेधाची घोषणा, आरोग्य सेवा ठप्प होणार?

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यासाठी अर्धा तास उशिराची मुभा; सरकारचा निर्णय, कारण काय?

अन् अर्जुनचा साक्षीला चेकमेट! कोर्टात दाखवला 'तो' पुरावा'; सगळेच शॉक, 'ठरलं तर मग'चा प्रोमो पाहून प्रेक्षक खुश

Eknath Shinde : राजकीय समीकरणे बदलणार? येवला तालुक्यात शिंदे गटाचे वर्चस्व वाढतेय

Government Scheme: मुलांच्या पालनपोषणासाठी मिळणार ४००० रुपये, मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना सुरू, अर्ज कसा करायचा?

SCROLL FOR NEXT