rain esakal
महाराष्ट्र बातम्या

कोकणात अतिवृष्टी, घाटमाथ्यावर मुसळधार

सूरज यादव

पुणे - महाराष्ट्राच्या बहुतांश भागात शुक्रवारी पावसाने हजेरी लागली. कोकणात अतिवृष्टी झाली. मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात जोरदार तर घाटमाथ्यावर मुसळधार पावसाने हजेरी लावली तर, मराठवाड्यातही पावसाच्या दमदार सरी पडल्या. येत्या काही दिवसात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

दक्षिण गुजरात किनारपट्टी ते उत्तर केरळपर्यंत असलेले द्रोणीय क्षेत्र आता दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीपट्टीपर्यंत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाच्या सरी पडत आहेत. सह्याद्रीच्या घाटमाथ्यांवर गेल्या चोवीस तासांमध्ये अतिवृष्टी झाल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदविण्यात आले.

हवामान विभागाचा अंदाज
- कोकण : कोकणातील बहुतांशी भागांत पावसाने थैमान घातले. कोकणातील जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली.
- मध्य महाराष्ट्र : मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगली भागात पावसाचा जोर वाढला आहे. तेथील कृष्णा, वारणा नद्यांची पाणीपातळी वाढली. मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी येत्या शनिवारी (ता. १९) मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पावसाचा जोर कमी होऊन तुरळक ठिकाणी पाऊस हजेरी लावेल, असे खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले.
- मराठवाडा : मराठवाड्याच्या काही भागात पावसाच्या मोठ्या सरी पडल्या. पण शनिवारनंतर तेथेही पावसाची विश्रांती घेईल. काही भागात पावसाच्या तुरळक सरी पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
- विदर्भ : विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यातील काही ठिकाणी पुढील चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाट होईल, असेही खात्याने स्पष्ट केले आहे.

राज्यातील पाऊस (संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत. सर्व आकडे मिलीमीटरमध्ये)
पुणे ........ ६.२
लोहगाव .... १६.४
कोल्हापूर ... १०
महाबळेश्वर ... ८१
नाशिक .... ५
सांगली ... १४
रत्नागिरी ... २८
उस्मानाबाद ... ५
परभणी ... ३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Japan PM Resign : जपानमध्ये राजकीय भूकंप, पक्षात फूट पडू नये म्हणून पंतप्रधानांचा राजीनाम्याचा निर्णय

"तू हिरोईन मटेरियल नाहीस.." मराठी इंडस्ट्रीत अभिनेत्रीला आला वाईट अनुभव; "आता मला फरक.."

Archery World Championships: भारतीय तिरंदाजी संघाचा सुवर्णवेध! जागतिक स्पर्धेत गोल्ड मेडलसह घडवला इतिहास

Latest Maharashtra News Live Updates: विरारमध्ये ४० वर्षे जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला; तीन जखमी

Pune Ganesh Visarjan : पुण्यात गणपती मंडळांपुढे पोलिस हतबल, कार्यकर्त्यांनी भर गर्दीत उडविलले फटाके, विसर्जन मिरवणूक रेंगाळली

SCROLL FOR NEXT