Raj Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray: राज फॉर्मात, आजच्या भाषणातले 5 नादखुळा डायलॉग वाचाच

संतोष कानडे

मुंबईः राज ठाकरेंनी आज मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी चौफेर फटकेबाजी केली. आज त्यांनी खास ठाकरे शैलीत डॉयलॉगबाजी केलीय.

Mumbai Raj Thackeray group president meeting

  • शिवरायांनी २३ किल्ले दिले ती चितळेंची बर्फी होती का?

    छत्रपती शिवाजी महाराजांनी २३ किल्ले मुघलांना दिले. कारण ती एक रणनिती होती. ते २३ किल्ले होते, चितळेंची बर्फी होती का? असं म्हणत राज ठाकरेंनी राहुल गांधींना चिमटा काढला. सावरकरांवर राहुल गांधींनी केलेल्या टीकेवर ते बोलत होते.

  • मला स्वतः भोवती हुजरे घालणारे कार्यकर्ते नकोयत

    मला माझ्याभोवती हुजरे घालणारे कार्यकर्ते निर्माण करायचे नाहीत. एकजुटीने काम करणारे कार्यकर्ते हवेत.आरे ला कारे म्हणणारे कार्यकर्ते मला पाहिजेत. येणारी मुंबई महानगरपालिका निवडणूक आपल्याला पूर्ण ताकदीने लढवायची आहे, त्यासाठी कामाला लागण्याचं आवाहन राज ठाकरेंनी केलं.

  • शिंदेंनी रात्रीतून कांडी फिरवली

    ''एकनाथ शिंदेंनी रात्रीतून जी काही कांडी फिरवली... आता फिरताहेत सगळीकडे. पैशासाठी दिसेल त्याच्या हातात हात घालून जाणं राज ठाकरेला कधी जमणार नाही. सध्या जे काही घाणेरडं राजकारण सुरुय ते आता थांबवलं पाहिजे.''

  • राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचा

    राहुल गांधींवर बोलतांना राज ठाकरे म्हणाले, राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचा आहे. गधड्या तुझी लायकी आहे काय सावरकरांवर बोलायची? म्हणे सावरकरांनी माफी मागितली. एक स्टॅटर्जी नावाची गोष्ट असते. त्याचाही विचार केला पाहिजे. कारण सर सलामत तर पगडी पचास. आमची कृष्णनीती आम्हाला हेच तर सांगत होती.

  • ...तेव्हा धोतर का नाही बोललं

    राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याबद्दल बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, जेव्हा प्रकल्प राज्याबाहेर जात होते तेव्हा धोतर का नाही बोललं? राज्यपाल पदावर बसलेत म्हणून काही बोलत नाही. नाहीतर आमच्याकडे शिव्यांची कमी नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी राज्यपालांवर टीकास्र सोडलं. महाराष्ट्र समृद्ध होताच, ते आम्हांला कोश्यारींकडून ऐकायची गरज नाही, असं म्हणत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्याचाही समाचार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बेस्ट अपघातातील मृतांची ओळख पटली, २५ ते ५० वर्षीय तीन महिलांचा समावेश; ९ जणांवर उपचार सुरू

King Cobra Kolhapur अबब! कोल्हापुरात आढळला तब्बल १० फुटांचा 'किंग कोब्रा', चिकन कंपनीजवळ दिसला अन्...

माझा मुलगा आणि ती... हेमलता बाणे खंडणी प्रकरणात अर्चना पाटकरांचा मोठा खुलासा; म्हणाल्या, 'माझ्या कुटुंबाचा तिच्याशी...

Priyanka Gandhi: कोण आहे प्रियांका गांधींची होणारी सून? ७ वर्षांचं नातं, आता साखरपुडा! ६५ कोटींची होणार मालकीण

Sindhudurg : धरण असूनही तहानलेले शहर! सावंतवाडीचा पाणीप्रश्न सुटणार तरी कधी?

SCROLL FOR NEXT