महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी; काय आहे प्रकरण?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात परळी कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात परळी कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं आहे. राज ठाकरे यांच्यावर चिथावणी दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. हे वॉरंट रद्द करण्यासाठी राज ठाकरे हे आज परळी कोर्टात राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. ज ठाकरे यांचं अटक वॉरंट रद्द होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर काय आहे प्रकरण जाणून घेऊ. (Raj Thackeray appear in parli court what is the matter)

काय आहे प्रकरण?

2008 मध्ये राज ठाकरेंना एका प्रकरणात मुंबईत अटक करण्यात आली होती. त्या अटकेचे पडसाद परळीतही उमटले होते. परळीतील धर्मापुरी पॉईंटवर मनसे कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक केली होती. याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर आणि चिथावणीखोर वक्तव्याबद्दल राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला होता.

पोलिसांनी चार्शीट फाईल केल्यानंतर राज ठाकरे न्यायालयात तारखेला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. आधी 3 जानेवारी आणि नंतर 12 जानेवारीला राज ठाकरेंना परळी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. पण, 12 तारखेला राष्ट्रमाता जिजाऊ जयंती होती, त्यामुळे न्यायालयाने तारीख वाढवून दिली आहे. त्यानुसार, आज ते कोर्टात हजर होत आहेत.

दोन वेळा वॉरंट जारी

याआधी राज ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी या सुनावणीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांना गेल्या वर्षी 6 जानेवारी 2022 रोजी अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले. त्यानंतर 10 फेब्रुवारी 2022 पर्यंत परळी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले.

मात्र, याविरोधात संजय आघाव, शिवदास बिडगर, अनीस बेग, प्रल्हाद सुरवसे, राम लटपटे यांनी कोर्टात धाव घेऊन अजामीनपात्र वॉरंट रद्द केले होते. त्यानंतर राज यांना 13 एप्रिल रोजी दुसऱ्यांदा अजामीनपात्र वॉरंट बजावले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT