eknath shinde and raj thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray: मुख्यमंत्री शिंदे-राज ठाकरे अन् 'वीर दौडले सात'! काय आहे कनेक्शन?

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुन्हा एकत्र येण्याचे संकेत मिळत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Raj Thackeray CM Eknath Shinde: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुन्हा एकत्र येण्याचे संकेत मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणाचे चित्र सातत्यानं बदलता दिसत आहे. त्यावरुन वेगवेगळ्या चर्चेला उधाणही आले आहे. त्यात राज आणि शिंदे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठी, हिंदी चित्रपट विश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या वीर दौडले सात या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा हा आज पार पडणार आहे. त्याला राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. सध्या राज्यातील एकापाठोपाठ एक महत्वाचे प्रकल्प वेगळ्या राज्यांमध्ये जात आहे. त्यावरुन विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षांना धारेवर धरले आहे. त्यातच राज ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं लक्ष वेधून घेतले होते.

वीर दौडले सातच्या मुहूर्त सोहळ्याच्या निमित्तानं राज पुन्हा काय बोलणार अशी चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांनी घेतलेल्या हर हर महादेव या चित्रपटाच्या निमित्तानं घेतलेल्या मुलाखतीमधून राज यांनी चौफेर फटकेबाजी केली होती. त्यानंतर ते पुन्हा एकदा एका मराठी चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याला हजेरी लावणार असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT