Raj Thackeray imitates Ajit Pawar at MNS Gudi Padawa Melawa criticizes Mahavikas Aghadi government 
महाराष्ट्र बातम्या

अजितदादांची नक्कल करत राज ठाकरे म्हणाले, पळून कुणासोबत गेले? लग्न कुणाबरोबर केलं?

सकाळ डिजिटल टीम

कोरोना ओसरल्यानंतर तब्बल दोन वर्षानंतर मुंबईच्या शिवाजी पार्कवर आज मनसेचा (MNS Gudi Padawa Melawa) गुढीपाडवा मेळावा होत आहे. या मेळाव्याला राज्यभरातून हजारो मनसे कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. या मेळाव्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाविकास आघडी सरकरवर टीकेची झोड उठवली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची नक्कल करत त्यांच्या पहाटेच्या त्या शपथविधीवरून टीका केली आहे.

त्यानी २०१९ मध्ये विधानसभा निवडणूकीनंतर राज्यात तयार झालेल्या राजकीय परिस्थितीवरुन टिका केली आहे. ते म्हणाले की, निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंना साक्षात्कार झाला. अडीच अडीच वर्षे ठरली होती, महाराष्ट्रात सभा झाल्या तेव्हा कधी बोलले नाहीत, इथे मुंबईत मोदी यांची सभा झाली तेव्हा व्यासपीठावर होतात तेव्हा बोलला नाहीत, मोदी – शहा हे दोन्ही बोलले मुख्यमंत्री फडणवीस होतील तेव्हा बोलले नाहीत. जेव्हा निकाल लागला तेव्हा सरकार आपल्यामुळे अडचणीत येऊ शकतं, मग काढलं… अडीच वर्षाचे काय झाले?, असा सवाल राज ठाकरेंनी केला.

इतकेच नाही तर त्यांनी पुढे “मी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री…” असे म्हणत अजित पवार यांची नक्कल करत त्यांच्यावर देखील टीका केली. ते पुढे म्हणाले की "एकदा सकाळी उठतो काय, पहातो काय, जोडा वेगळाच, सालं पळून कोणाबरोबर गेली, लग्न कोणा बरोबर केलं हेच समजेना,” असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

राज ठाकरे म्हणाले, "तीन नंबरचा पक्ष एक आणि दोन नंबरला फिरवतोय. महाराष्ट्राच्या जनतेशी तुम्ही काय बोलता. आधी शिव्या देतात आणि नंतर एकमेकांच्या मांडीवर बसतात. कारण सांगतात अडीच वर्षांचं तुमचं आतलं झेंगाट, आमच्याशी काय संबंध. ज्या मतदारांनी मतदान केलं ते युती म्हणून केलं. शरद पवार आणि काँग्रेससोबत जाण्यासाठी केलं नव्हतं. मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना कोणतं शासन देणार" असा सवाल देखील त्यांनी विचारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण सुरूच! मात्र LPG गॅस टंचाईमुळे हे शेअर्स आजही तेजीत

Summer Skincare Home Remedies: चेहऱ्यावरची चमक हरवलीय? उन्हाळ्यात त्वचा उजळवण्यासाठी करा ‘हे’ 7 सोपे घरगुती उपाय

Rahul Dravid: ‘द वॉल' राहुल द्रविड यांना जीवनगौरव पुरस्कार; बीसीसीआयच्या वार्षिक सोहळ्यात विश्वविजेत्या संघांचाही गौरव होणार

Shivaji University : ठरलं! शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीचा क्लायमॅक्स जवळ; पाहा मुलाखतीसाठी कुणा-कुणाची नावे शॉर्टलिस्ट? 115 अर्ज, पण संधी फक्त 25 जणांना

LPG Price Hike:सिलिंडरच्या दरवाढीमुळे सामान्यांना फटका! घरगुती सिलिंडर ६० तर व्यावसायिक सिलिंडर ११४ रुपयांनी महाग; आर्थिक गणित बिघडलं..

SCROLL FOR NEXT