Raj Thackrey Esakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackrey: 'मी तुला दिसलो का गाडीमध्ये झोपलेलो..', राज ठाकरेंची अजित पवारांच्या स्टाईलमध्ये मिमीक्री

अजित पवारांच्या स्टाईलमध्ये राज ठाकरेंनी केली मिमीक्री

अंकिता खाणे (Ankita Khane)

Raj Thackrey On Ajit Pawar: आज पनवेलमध्ये मनसेचा निर्धार मेळावा पार पडत आहे. यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. राज्याच्या राजकारणात घडत असलेल्या घडामोंडीवर बोलताना राज ठाकरेंनी भाजपसह अजित पवारांवर हल्लाबोल करत अजित पवारांची मिमिक्री केली आहे.

अजित पवार आणि शरद पवार यांची पुण्यात गुप्त भेट झाली. त्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. त्यानंतर अजित पवारांनी काल कोल्हापूरमध्ये बोलताना सांगितलं की, चौरडिया यांच्या घरातून बाहेर पडलेल्या आणि धडकलेल्या गाडीत मी नव्हतो. त्यावर राज ठाकरेंनी मिमिक्री केली आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

मला असं वाटतं भाजपने दुसऱ्यांचे आमदार न फोडता स्वत:चा पक्ष तयार करायला शिकावा,लोकांच्या गनपट्टीवर बंदुका ठेवायच्या आणि आतमध्ये आणायचे आणि ते लोक आतमध्ये गाडीमध्ये झोपून जाणार, 'मी तुला दिसलो का गाडीमध्ये, झोपलो होतो का मी गाडीत, दिसलो का तुला? असं म्हणणार', असं म्हणत राज ठाकरेंनी अजित पवारांची मिमिक्री करून दाखवली आहे.

पुढे ते म्हणाले की, राज्यात सध्या निर्लज्जपणाचा कळस सुरू आहे. सरकारमध्ये कशाला आले तर, महाराष्ट्राचा विकास करायचा आहे मला, कशाला खोटं बोलताय असंही राज ठाकरे म्हणालेत.

अजित पवार काय म्हणाले होते?

शरद पवारंच्या भेटीनंतर अजित पवार बाहेर पडत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला असं अनेक माध्यमांनी सांगितलं होतं. त्यासंबधीचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. त्यावर अजित पवार म्हणाले, "तुम्ही मला लपून गेल्याचं कुठे बघितलं?. मी उद्या तुमच्या घरी आलो, तर कधी निघायच हे मी ठरवणार. मी बैठकीला गेला हे मान्य करतो. पण चौरडिया यांच्या घरातून बाहेर पडलेल्या आणि धडकलेल्या गाडीत मी नव्हतोच असे अजित पवार म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT