raj thackeray old statement about shivsena mp sanjay raut ncp sharad-pawar goes viral  
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut | राज ठाकरेंच संजय राऊतांच्या बाबतीतल भाकीत खरं ठरलं?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पत्रा चाळ प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना विशेष पीएमएलए कोर्टानं आज 4 ऑगस्टपर्यंत अर्थात चार दिवसांची ईडीची कोठडी सुनावली. या प्रकरणात संजय राऊत चांगलेच आडचणीत सापडतान दिसत आहेत. आता राऊत यांना ईडीच्या कोठडीत रहावं लागणार आहे. ईडीनं रविवारी राऊतांच्या घरी छापेमारी करत तब्बल ९ तास संजय राऊत यांची चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना रात्री उशीरा अटक करण्यात आली. राऊतांवरील या कारवाईनंतर राज ठाकरे यांचा काही महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये राज ठाकरे यांनी वर्तवलेले भाकित खरं ठरणार का अशी चर्चा रंगली आहे.

शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊतांना ईडीने अटक केल्याने सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. या चर्चांदरम्यान राज ठाकरे यांच्या दोन वक्तव्यांची देखील चर्चा केली जात आहे. राज ठाकरे हे काही दिवसांपूर्वी दिवा शहरात आले असताना पत्रकारांशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविषयी एक प्रतिक्रिया दिली होती.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले होते की, आता त्यांनी (संजय राऊत) एकांतात बोलण्याची प्रॅक्टीस करावी. संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका करताना, आमचं राजकारण मिमिक्रीवर चाल नाही, अशा घोचक शब्दात राज ठाकरेंवर निशाणा साधला होता. त्याला राज ठाकरे यांनी हे प्रत्युत्तर दिलं होतं.

तसेच पुढे एका सभेत बोलताना मनले अध्यक्ष राज ठाकरे असेही म्हणाले होते की, सध्या शरद पवारसाहेब संजय राऊतांवर खूश आहेत. पण कधी टांगलेला दिसेल कळणार पण नाही. दरम्यान आता संजय राऊतांना ईडीने अटक केल्यानंतर या दोन्ही विधानांची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

संजय राऊतांवर झालेल्या कारवाईबद्दल बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत हा माझा जुना मित्र आहे, त्याचा मला अभिमान आहे. त्याचा गुन्हा नसतानाही त्याला अटक करण्यात आली आहे. त्याचं मरण आलं तरी शरण जाणार नाही हे त्यांचं वाक्य मला खूप आवडतं, असे म्हटले आहे.

राऊत शरण देखील जाऊ शकत होते, पण ते गेले नाहीत कारण ते एकनिष्ठ आहेत. त्याचबरोबर जे माझ्यासोबत आहेत ते दमदार आहेत आणि जे तिकडे गेले आहेत त्यांना तिकडे फक्त सत्तेचा फेस शिल्लक राहिल्यावर समजेल असं ठाकरे म्हणाले. शिवसेना संपवण्याचे प्रयत्न सध्या होत आहेत पण ते होऊ शकत नाही, देशातील राजकारण आता घृणास्पद होऊ लागलं आहे. तुम्हाला शिवसेना संपवायची असेल तर जनतेत जाऊन संपवून दाखवा असं आव्हान ठाकरेंनी दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathwada Development Package : मराठवाड्याच्या विकासासाठी मंत्रिमंडळ बैठकीतील कोटींची उड्डाणे हवेतच! धक्कादायक आकडेवारी समोर

Satej Patil Hasan Mushrif : 'हसन मुश्रीफ हतबल, महायुतीत आताच डोकीफुटत आहेत'; सतेज पाटील यांची टीका, गोकुळ निवडणुकीवरून राजकारण तापलं

Raju Shetti: १५ ऑक्टोबरला कारखान्यांची धुराडी पेटल्यास संघर्ष; राजू शेट्टींचा इशारा, हुबळीत केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार

४० पैशांनी जीव जाणार नाही, प्रत्येक गोष्टीवर कर दिला पाहिजे; UPI शुल्कावर नीति आयोगाच्या उपाध्यक्षांचं विधान, सांगितली चाणक्यनीति

Kagal Municipal Council : कागल नगरपरिषदेतील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू; हसन मुश्रीफ, समरजित घाटगेंच्या कारभारावर सवाल, कर्मचाऱ्यांचा ठिय्या

SCROLL FOR NEXT