Raj Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray :...वादाची किनार उगाचच लागली!; नव्या संसदेच्या उद्घाटनवर राज ठाकरेंची खंत

रोहित कणसे

नवीन संसद भवनाचे आज,२८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.भव्य सोहळा देशभरातील नेते सहभागी झाले होते. दरम्यान या नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर देशातील २१ विरोधीपक्षांनी मात्र बहिष्कार टाकला होता. आता मनेस अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करत याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

नवीन संसद भवनाच्या उद्घटन सोहळ्यावरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.यावरून राज ठाकरे यांनी खंत व्यक्त केली आहे."आज देशाच्या नवीन संसदभवनाचं लोकार्पण झालं. संसदभवन हे देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ, त्याचं औचित्य आणि गांभीर्य नव्या वास्तूत पण टिकून राहू दे."

"ह्या सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली, ती लागली नसती तर बरं झालं असतं. असो, ह्या वास्तूच्या निर्माणासाठी आणि ही वास्तू ज्या लोकशाहीचं प्रतीक आहे ती लोकशाही टिकवण्यासाठी आजपर्यंत झटलेल्या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन. भारतीय लोकशाही चिरायू होवो." असे ट्वीट राज ठाकरे यांनी केलं आहे.

नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे ही मागणी करत विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (२८ मे) संसदेच्या नव्याने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन केले.

त्याआधी, पंतप्रधान मोदींनी लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ ऐतिहासिक राजदंड 'सेंगोल' देखील बसवला. संसद भवनाच्या उद्घाटनानंतर, पंतप्रधान मोदी नवीन संसदेच्या आत लोकसभेत पोहोचले, जिथे त्यांनी एक विशेष स्मारक टपाल तिकीट आणि ७५ रुपयांचे नाणे देखील जारी केले. यावेळी विविध पक्षांचे खासदार आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता AI ठरवणार संघात कोणाला संधी मिळणार! क्रिकेटमध्ये तंत्रज्ञानाचा नवा अध्याय; आकडेवारीपासून थेट संघ निवडीसाठी वापर होणार

Raigad Shivrajyabhishek celebration: रायगडावर तिथीनुसार ३५३ वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गडावर शिवमय वातावरण

Vat Purnima 2026: घराजवळ वडाचं झाड नाहीये? मग 'अशी' करा घरच्या घरीच वटपौर्णिमेची पूजा; जाणून घ्या सोपा उपाय

Latest Marathi News Live Update : धुळे जिल्ह्यात पावसाची दांडी; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

राम मंदिरातील धार्मिक कार्यात असायचा सहभाग, पण मागे सुरू होतं भलतंच; टिन्नू यादवच्या कारनाम्याने अयोध्या हादरली!

SCROLL FOR NEXT