Raj Thackeray Esakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray: राज ठाकरे- दादा भुसेंच्या बैठकीत टोल नाक्यावर सकारात्मक चर्चा; बैठकीत घेतले 'हे' मोठे निर्णय

टोलसंदर्भात आज राज ठाकरेंच्या निवासस्थानी मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक

अंकिता खाणे (Ankita Khane)

आज सकाळी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मंत्री दादा भुसे यांच्यात दोन तास बैठक पार पडली. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी या बैठकीमध्ये कोणत्या महत्त्वाच्या बाबींवर चर्चा झाली याची माहिती दिली आहे. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले काल(गुरूवारी) मुख्यमंत्र्यासोबत बैठक पार पडली. त्यानंतर आजही टोल संबधी चर्चा झाली. तब्बल ९ वर्षांनंतर मी या विषयासाठी अतिथीगृहावर गेलो होतो. त्यावेळी तिथे पृथ्वीराज चव्हाण होते असं राज ठाकरे म्हणाले.

काल सह्याद्रीवर मुख्यमंत्री- मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. काही गोष्टी ठरल्या. मात्र, त्या लेखी स्वरुपात आल्या नव्हत्या. तिथे असं ठरलं की, आज एक बैठक घेऊन त्या लेखी स्वरुपात तुमच्यासमोर गोष्टी आणाव्यात. झालेल्या ॲग्रीमेंटमध्ये काही चुकीच्या गोष्टी होत्या. त्यात काही गोष्टींची सुधारणा व्हायला हव्यात. आता पुन्हा तो विषय ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपुर्वी अविनाश जाधव यांनी आंदोलन केलं होतं. त्यावेळी मी म्हणालो होतो, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करेन त्यानंतर काल मी त्यांच्याशी चर्चा केली. काही गोष्टी त्यांच्यासमोर मांडल्या, असं राज ठाकरे म्हणाले.

त्याचबरोबर त्यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानामुळे सर्वत्र चलबिचल सुरू झाली, लोकांना वाटलं की आम्हला फसवलं जाताय की काय? टोल घेणार असाल तर तुम्ही कोणत्या सोयीसुविधा दिल्या गेल्या आहेत त्यांची अंमलबजावणी झालेली नाही, पुढचे 15 दिवस या सर्व एन्ट्री पॉईंट्स वर सरकार आणि आमच्या पक्षाचे कॅमेरे लावले जातील आणि किती गाड्या या टोल वरून जातात हे कळेल ही व्हिडिओग्राफी उद्या पासून सुरू होईल, असंही राज ठाकरे म्हणाले.

तर टोल नाक्यावर कोणकोणत्या सुधारणा व्हाव्यात यावर आमच्यात चर्चा झाली. टोल घेणार असाल तर तुम्ही काही सुविधा देणार हे ॲग्रीमेंटमध्ये काही गोष्टी असतात त्यांची अंमलबजावणी झाली नाही असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

त्याचबरोबर करारात नमुद केलेल्या सर्व सोयीसुविधा स्वच्छ प्रसादनगृह(महिलासांठी आणि पुरूषांसाठी), प्रथमोपचार, आरोग्यवाहिका, प्रकाशयंत्रणा, तक्रार वही, मंत्रालयात सेल उभा करुन व्हिडिओग्राफीवर लक्ष ठेवली जाईल. लोकांना होणाऱ्या त्रासासाठी एक नंबर दिला जाईल, ही यत्रंणा मंत्रालयात असेल या सुविधा तात्काळ दिल्या जातील.

भुयारी मार्ग आणि उड्डाणपूल यांचे आयआयटीकडून सर्वे केले जातील. ठाण्यात चार चाकी वर लागलेला टोलवाढ रद्द करण्यासाठी सरकारला वेळ हवा आहे, त्याबाबतचा निर्णाय एका महिन्यात घेतला जाईल. येलो लाईनच्या पुढे गाड्यांची रांग लागली तर टोल घेणार नाही, सर्व गाड्या सोडल्या जातील. टोल नाक्यावर पोलिसांच्या माध्यमातून यंत्रणा राबवली जाईल, असंही राज ठाकरे यावेळी म्हणालेत.

टोल नाक्यावर फास्ट ट्रॅकवर चालला नाही तर एकदाच पैसे भरावे लागतील, पुन्हा पैसे भरायचे नाही. टोल नाक्यावर मोठा बोर्डवर किती पैसे भरुन झाले, किती बाकी आहेत हे स्पष्ट दाखवलं जाईल. ठाण्यात आनंद नाक्यावरील लोकांना दोन वेळा टोल भरावा लागतो, ऐरोली नाक्यावर तो एकदाच भरावा लागेल, सरकार त्याबाबत जीआर काढेल याबाबत सर्वे होईल असंही राज ठाकरे म्हणालेत.

बैठकीत घेण्यात आलेले निर्णय

पुढच्या पंधरा दिवसात सर्व एन्ट्री पॉईंटवर राज्य सरकार आणि मनसेकडून कॅमेरे लावण्यात येणार आहेत.टोल नाक्यावर पोलीस तैनात केले जातील. 4 मिनिटांच्या पुढे एकही गाडी टोलनाक्यावर थांबणार नाही. मंत्रालयात टोलसंदर्भात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येणार. PWD चे 29, तर MSRDC चे 15 जुने टोलनाके बंद करण्याची मागणी करण्यात येईल. आनंदनगर किंवा ऐरोली एकाच ठिकाणी टोल भरावा. डिजीटल बोर्ड लावून किती टोलवसूली झाली याची माहिती दिली जाईल. नागरिकांना तक्रारींसाठी टोलनाक्यावर नंबर पुरवला जाईल.उड्डाणपूल , भुयारी मार्गांचे आयआयटीकडून ऑडिट केले जाणार.

टोलनाक्याजवळ राहणाऱ्या नागरिकांसाठी सवलतीत पास मिळणार. चारचारी वाहनांवरील टोलदरवाढ रद्द करण्यासाठी सरकारला १ महिन्याचा अवधी दिला. फास्टटॅग चालला नाही तर एकदाच पैसे घेतले जातील.या मागण्यांवर टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होताना दिसेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT