MNS president Raj Thackeray  Sakal
महाराष्ट्र बातम्या

राज ठाकरेंच्या औरंगाबादेतील सभेविरोधात याचिका दाखल

औरंगाबाद शहरात राज ठाकरे यांची सभा होणार असून त्यांच्याविरोधात औरंगाबाद हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली आहे.

दत्ता लवांडे

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सभा होणार असून त्यांच्याविरोधात औरंगाबाद हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. रिपब्लिक युवा मोर्चाचे जयकिसन कांबळे यांनी ही याचिका दाखल केली असून १ मे रोजी राज ठाकरे यांची सभा औरंगाबाद येथे होणार आहे.

(Petition Filed Against Raj Thackeray's Aurangabad Meeting)

राज ठाकरे यांच्या सभेसंदर्भात काही निर्देश देण्यात यावेत तसेच त्यांची औरंगाबादेतील सभा होऊ नये आणि झालीच तर सभेचं थेट प्रक्षेपण करण्यात येऊ नये या मागण्यांसह याचिका औरंगाबाद हायकोर्टात दाखल करण्यात आली असून यावर आज सुनावणी होणार असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितलं आहे. तसेच ही सभा होऊ नये हीच आमची मूळ मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं.

राज ठाकरे हे जाणूनबुजून आणि मुद्दाम दोन समाजात जातीय तेढ निर्माण करत असतील तर ही सभा थांबवण्यात यावी. दोन समाजात तेढ निर्माण झाला तर वाद होऊ शकतो, दंगल होऊ शकते. गृहमंत्री वळसे पाटलांनी सुद्धा या प्रकरणावर मिटींग घेतल्या आहेत तसेच हा वाद निर्माण होऊ नये यासाठी आम्ही याचिका दाखल केली असल्याचं याचिकाकर्ते जयकिसन कांबळे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान राज ठाकरे यांनी मागच्या दोन सभेतील भाषणाविरोधात बेताल वक्तव्य निर्माण केलं आहे. त्यांच्या भाषणात वारंवार हिंदू मुस्लीम असे मुद्दे येत असतात. आता रमजानचा सण जवळ येत असून त्यांच्या तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यावरुन दंगलसुद्धा होऊ शकते म्हणून आम्ही याचिकेमध्ये राज ठाकरे यांचं भाषण तपासून घेण्यात यावं अशी मागणी केली असल्याचं याचिकाकर्ते जयकिसन कांबळे यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT