Raj Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

राज ठाकरे यांच्या यशासाठी पुण्यात पुरोहित करणार पूजा

गुरुजी आणि पुरोहित यांच्या उपस्थितीत उद्या राज ठाकरे यांना शुभ आशीर्वाद देण्यात येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : १०० ते २०० गुरुजी आणि पुरोहित यांच्या उपस्थितीत उद्या शनिवारी (ता.३०) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना शुभ आशीर्वाद देण्यात येणार आहे. त्यांच्या पुढील कार्यासाठी यश मिळो यासाठी गुरुजी पूजा करणार आहेत. उद्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पुणे (Pune) येथील घराबाहेर धार्मिकविधी होणार आहे. उद्या साडेआठ वाजता सकाळी राज ठाकरे औरंगाबादकडे (Aurangabad) निघणार आहेत. या प्रसंगी त्यांच्याबरोबर हजारो कार्यकर्ते असतील. दरम्यान वाढू येथे राज ठाकरे जाऊन छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे आशीर्वाद घेतील. (Raj Thackeray Purohit Perform Puja For Success Of MNS Chief In Pune)

औरंगाबाद येथील राज ठाकरे यांची १ मे रोजी म्हणजे रविवारी होणाऱ्या सभेला (Raj Thackeray Sabha) अखेर परवानगी मिळाली आहे. मात्र त्यावर चांगलेच राजकारण पेटले आहे. अनेक राजकीय संघटनांनी सभेला विरोध केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही या विरोध नोंदवला आहे. राज यांच्या सभेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.

मात्र सभेला औरंगाबाद पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी परवानगी दिली असली तरी अनेक अटी घातल्या आहेत. त्यामुळे भव्य अशी सभा होणार असल्याचे मनसे पदाधिकारी सांगत होते. पण अटींमुळे उपस्थितांची संख्येवर मर्यादा आणण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pre-Monsoon Rain Alert India : पुढील तीन दिवसांत मुसळधार पाऊस; IMD कडून 'या' राज्यांना अलर्ट जारी, एल निनोचं संकट तरीही 2026 मध्ये धो-धो कोसळणार!

NSE Gold: आता Demat मध्येही ठेवता येणार सोनं! NSE ची नवी डिजिटल गोल्ड योजना सुरू; नेमकं काय आहे EGR?

पैशांच्या नाही, तर प्रेमाच्या जोरावर विजय! लोकांच्या घरी भांडी घासणाऱ्या कलिता मांझी झाल्या आमदार, २५०० रुपयांच्या पगारात कशी जिंकली निवडणूक?

हार्दिक पांड्या खेळणार की नाही? मुंबई इंडियन्स म्हणते...

Angarki Sankashti Chaturthi 2026: आसपासच्या नकारात्मकतेपासून वाचण्यासाठी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सुरू करा श्रीगणेशाच्या 'या' रक्षा मंत्राचा जप

SCROLL FOR NEXT