Raj Thackeray Talks With Karate Player Pranita Pawar  esakal
महाराष्ट्र बातम्या

आंतरराष्ट्रीय खेळाडूची उपासमार, राज ठाकरेंनी फोनवरुन संवाद साधून दिला धीर

कोरोनाने प्रणिताच्या वडिलांचे निधन झाले. ते रिक्षा चालवून घर चालवत होते.

गणेश पिटेकर

उस्मानाबाद : हालाखीच्या स्थितीत महिला खेळाडू जीवन जगत आहे. प्रणिता मोहन पवार असे त्या महिला खेळाडूचे नाव आहे. उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील रामतीर्थ तांडा (ता.तुळजापूर) येथील प्रणिता ही रहिवासी आहे. वर्ष २०१७ मध्ये श्रीलंकेत पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत भारताला तिने सुवर्ण पदक मिळवून दिले होते. यातून तिने देशाचे नाव जगभरात पोहोचवले. पण या आंतरराष्ट्रीय खेळाडूवर उपासमारीची वेळी आली आहे. दीड वर्षांपूर्वी कोरोनाने प्रणिताच्या वडिलांचे निधन झाले. ते रिक्षा चालवून घर चालवत होते. या घटनेमुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आई काही काम करुन कसेतरी घर खर्च करत आहे. (Raj Thackeray Talks With Karate Player Pranita Pawar And Give Courage)

मात्र प्रणिताच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाप्रमुख प्रशांत नवगिरे यांना मिळाली. त्यांनी प्रणिताच्या कुटुंबीयांची भेट घेतली. याबाबत पक्षप्रमुख राज ठाकरेंना (Raj Thackeray) माहिती देताच त्यांनी प्रणिता पवारशी (Pranita Pawar) फोनवरुन संवाद साधत धीर दिला. पक्षाने शैक्षणिक दायित्व स्वीकारत आर्थिक व इतर मदत केली आहे. मनसेने पाठिशी राहावं अशी विनंती प्रणिताने राज ठाकरेंना केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT