Raj Thackeray
Raj Thackeray  esakal
महाराष्ट्र

Raj Thackeray : आपली सत्ता येणार, फक्त 'हे' करा; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला सल्ला

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः मनसेच्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्त ठाण्यात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी राज ठाकरे यांनी भाजपसह ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. याचवेळी त्यांनी कार्यकर्त्यांना सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी मोलाचा सल्ला दिला आहे.

यावेळी बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, कार्यकर्त्यांनी निराश होण्याची गरज नाही. १९५२मध्ये जनसंघाची स्थापना झाली. त्याच जनसंघाला म्हणजे आजच्या भाजपला सत्तेत यायला २०१४ उजाडावं लागलं. सध्या राज्यात सुरु असलेल्या तमाशाला जनता वैतागली आहे. आता आपण सत्तेपासून फार काळ दूर राहणार नाही. मळभ दूर होतील. नुसती आशा दाखवत नाही तर आपण सत्तेच्या जवळ आहोत, असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केलं.

ते पुढे म्हणाले की, नुसती सत्ता हे माझं स्वप्न नाही. माझ्या मनात नवनिर्माणाचं स्वप्न आहे. आपल्याला बदल घडवायचा आहे. येत्या निवडणुकांमध्ये जोमाने कामाला लागा. मी तुमच्या मतदारसंघात येणार, सभा घेणार तुम्ही घराघरात जा. लोकांशी भेटा, भूमिका समजून सांगा, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.

देशाला प्रबोधन केलेला महाराष्ट्र आच कुठंय?- राज

इंदू मीलमध्ये मोठी वास्तू आणि ग्रंथालय उभारलं पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्यासाठी आख्खं जग तिथं आलं पाहिजे. नुसते पुतळे उभारुन काहीही होत नाही. नुसत्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या करुन काहीही होणार नाही. आज राज्यात जे काही चाललंय, ते बघून गलिच्छपणा आणि घाण राजकारणाचा प्रत्यय येतोय. एवढ्या खालच्या स्तराची भाषा कधीही पाहिली नव्हती. देशाला प्रबोधन केलेला महाराष्ट्र आज कुठेय? असा प्रश्न पडतोय, असं राज ठाकरे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

Vada Pav Girl: ना अटक झाली, ना केस.. मग वडापाव गर्लला का घेऊन गेले दिल्ली पोलीस? व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

Viral Video: शिक्षिकेला शाळेत उशिरा येणे पडलं महागात, मुख्याध्यापिकेने केली मारहाण, कपडेही फाडले

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वलसाडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT