Cm Eknath Shinde Raj Thackeray  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray: राजकीय घडामोडींना वेग! राज ठाकरे CM शिंदेंच्या भेटीला वर्षा निवासस्थानी

गेल्या काही दिवसांत राज्यातील राजकारणात खळबळ उडवणाऱ्या गोष्टी घडल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांच्यासह ते या भेटीसाठी पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांत राज्यातील राजकारणात खळबळ उडवणाऱ्या गोष्टी घडल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आहे. (Raj Thackeray visits CM Eknath Shinde at Varsha residence Maharashtra Politics)

राज ठाकरे हे आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेले आहेत. ही भेट नेमकी कोण्यत्या कारणासाठी होत आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. राज्यातील काही प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ते आपल्या सहकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेल्याचं बोललं जात आहे. पण या भेटीचे अनेक राजकीय अर्थ देखील काढले जात आहेत. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेसचा सरकारमध्ये समावेश झाल्यानंतर राज्यातील राजकारण आता अधिकच अस्थिर झाल्याचं दिसून येत आहे. कारण यामागे काही नव्या राजकीय समिकरणांवर देखील चर्चा होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडाच राज ठाकरे यांनी वैचारिक भूमिकेचा दाखला देत स्वागत केलं होतं. तेव्हापासून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या अनेकदा भेटी झाल्या आहेत. त्यांच्यातील संबंध चांगले राहिले आहेत. (Marathi Tajya Batmya)

दरम्यान, महापालिकेच्या निवडणुकांसाठी देखील राज्यातील पक्षांनी तयारी सुरु केल्या आहेत. त्यादृष्टीनं राज्यात काही नवी राजकीय समिकरणंही मांडली जाऊ शकतात. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीकडं पाहिलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT