Raj Thackeray Warned Maharashtra Government Sakal
महाराष्ट्र बातम्या

Hanuman Chalisa Row : 'धार्मिक रंग दिला तर...', राज ठाकरेंचा सरकारला इशारा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात भोंग्यांवरून राजकारण (Maharashtra Loudspeaker Controversy) तापलं आहे. मुंबई पोलिसांनी आज मनसेच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका जाहीर केली आहे. राज ठाकरे भोंगे उतरविण्याच्या भूमिकेवर ठाम असून या प्रकरणाला धार्मिक वळण देऊ नका. तुम्ही धार्मिक वळण दिलं तर आम्ही धार्मिक उत्तर देऊ, असा इशारा राज ठाकरे (Raj Thackeray Warned Maharashtra Government) यांनी राज्य सरकारला दिला आहे.

अनधिकृत गोष्टींना अधिकृत परवाने देत आहात. हा विषय सकाळच्या अजानबाबतचा नाही. दिवसभर ते प्रार्थना म्हणतात. पण, त्यांनी अजान वाजवली तर आमचे कार्यकर्ते भोंग्यांवरून हनुमान चालिसा वाजवणार म्हणजे वाजवणार. भोंगे उतरविण्यासाठी डेसिबल मोजत बोसणार का? तुम्ही धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही धार्मिक उत्तर देऊ. राज्यातील शांतता बिघडावी अशी मुळीच इच्छा नाही. आम्ही शांततेत समजावून सांगतोय. तुम्ही कशासाठी धरपकड करताय? असा सवाल देखील राज ठाकरेंनी सरकारला विचारला.

राज्यात १३५ मशिदींमध्ये सकाळी ५ च्या आधी अजान झाली. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले. त्यांच्यावर राज्य सरकार कोणती कारवाई करणार? आमच्यावरच कारवाई का होते? अनेक ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना नोटीस पाठवत आहेत. त्यांना ताब्यात घेत आहेत. ही गोष्ट फक्त आमच्या बाबतीत काय होत आहे? जे कायद्याचं पालन करत आहेत त्यांना तुम्ही ताब्यात घेणार आणि जे पालन करत नाहीत त्यांना तुम्ही मोकळीक देणार का? असा सवालही राज ठाकरेंनी सरकारला विचारला.

राज ठाकरे भूमिकेवर ठाम -

जिकडे भोंगे लागतील तिकडे दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजणार आहेत. हा विषय धार्मिक नाहीतर सामाजिक आहे. राज्य सरकारसाठी माणुसकीपेक्षा धर्म मोठा आहे का? पोलिसांनी भोंगे खाली आणले पाहिजे. नाहीतर आम्ही भोंगे उतरवू. हा विषय एक दिवसाचा नाही. हा विषय कायम सुरू राहणार. जोपर्यंत उतरवले जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, अशी ठाम भूमिकाही राज ठाकरेंनी यावेळी बोलून दाखवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोन्याची झळाळी झाली कमी, ४ दिवसात ७ हजारांनी स्वस्त; आज किती आहे दर?

Kolhapur Collector Office : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात शिक्षकाचा पेटवून घेण्याचा प्रयत्न, अचानक घडलेल्या प्रकारामुळे तणाव

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्याला पावसाने झोपडले

'जैन मंदिर किंवा मंत्रिपद वाचवा', मोहोळ यांना मुंबईत वरिष्ठांनी वॉर्निंग दिल्याचा धंगेकरांचा खळबळजनक दावा

HIV infected Blood : हॉस्पिटलचा हलगर्जीपणा, थॅलेसिमियाग्रस्त ५ मुलांना चढवले एचआयव्ही संक्रमित रक्त

SCROLL FOR NEXT