Raj Thackeray Maha Aarti from MNS against mosques loudspeaker pune
Raj Thackeray Maha Aarti from MNS against mosques loudspeaker pune  sakal
महाराष्ट्र

सहनशीलतेचा अंत पाहू नका; राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. याबाबत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. यामध्ये त्यांनी राज्य सरकारने मनसेच्या सहशीलतेचा अंत पाहू नये, असा सूचक इशार दिला आहे. (Raj Thackeray Letter To CM Uddhav Thackeray)

राज ठाकरे यांनी पाठवण्यात आलेल्या पत्रात, सरकारला माझं एकच सांगणं आहे की, राज्य सरकारने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. सत्ता येत जात असते कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. दरम्यान, मनसेकडून करण्यात येणारे लाऊड स्पिकरवरील आंदोलन हे त्यापासून होणाऱ्या आवाजाच्या प्रदुषणाबाबत होते. मात्र, राज्य सरकारन मनसैनिकांवर ज्या पद्धतीने कारवाई करत आहे ती अत्यंत चुकीची आहे.

पत्रात नेमकं काय ?

सर्व देशबांधवांना मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे. देशाचे सर्वोच्च न्यायालय आणि विविध राज्यातील उच्च न्यायालयं यांनी दिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी यासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी 4 मे रोजी 'भोंगे उतरवा' आंदोलन सुरु करण्यापूर्वी ठिकठिकाणी त्यांची धरपकड करण्यात आली. तब्बल 28 हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या, हजोरोंना तडीपार केलं आणि अनेकांना तुरुंगात डांबलं, कशासाठी? ध्वनिप्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनअधिककृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी!

गेला आठवडा महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे हे पाहता मला प्रश्न पडला आहे की, मशिदींमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी 'धरपडक मोहीम' राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का? आमचा संदीप देशपांडे आणि इतर अनेक कार्यकर्त्यांना पोलीस असे काही शोधत आहेत जणू, ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैद्राबाद संस्थानातले 'रझाकार' आहेत! अर्थात, महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिलेत हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत.

त्यामुळे राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे; आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Yuzvendra Chahal: ऋषभ पंतची विकेट चहलसाठी ठरली ऐतिहासिक! T20 मध्ये कोणत्याच भारतीयाला न जमलेला केला पराक्रम

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचे राजस्थानसमोर 222 धावांचे लक्ष्य! फ्रेझर-मॅकगर्क, पोरेलचे अर्धशतक, तर स्टब्सची अखेरीस तुफानी फटकेबाजी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

SCROLL FOR NEXT