rajesh kshirsagar Esakal
महाराष्ट्र बातम्या

राजेश क्षीरसागरांचे भाजपावर टीकास्त्र; म्हणाले,आमची मर्दाची पध्दत....

शत्रुला अंगावर घेऊन हरविण्याची शिवसेनेची पध्दत-राजेश क्षीरसागर

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर उत्तर निवडणुकीत रणधुमाळी सुरु आहे. भाजप आणि काॅंग्रेस नेत्यांनी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीत चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काॅंग्रेसवर टीका केली आहे. याला शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. शत्रूला अंगावर घेऊन पुढून वार करुन हरविण्याची आमची मर्दाची पध्दत आहे अशा कडक शब्दात भाजपवर टीकास्त्र सोडले. या निवडणुकीत शिवसेना कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागून होते. चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या भूमिकेबाबत संदिग्धता होती त्याबाबतचा स्पष्ट खुलासा राजेश क्षीरसागर यांनी आज केला.

क्षीरसागर म्हणाले, शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार काॅंग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांना शिवसैनिक विजयी करुन दाखवतील, असा ठाम विश्वास राजेश क्षीरसागर यांनी दिला. कोल्हापूर उत्तर मतदार संघातील काॅंग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरण्यास जाण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या बैठकीत क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) बोलत होते.

भाजपवर निशाणा साधताना ते म्हणाले, पाठीमागून वार करण्याची सवय शिवसेनेला नाही, शत्रूला अंगावर घेऊन पुढून वार करुन हरविण्याची आमची मर्दाची पध्दत आहे, अशा शब्दात भाजपावर हल्लाबोल केला.

जयश्री जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, सहकार राज्यमंत्री बाळासाहेब पाटील, उच्च व तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत, मालोजीराजे छत्रपती, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्यासह कॉग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आरपीआर कवाडे गट या पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख - भूमिकन्यांचा सन्मान

हिवाळ्याची खास चव! घरी बनवा गरमागरम गुळाची पोळी, रेसिपी इतकी सोपी की लगेच नोट कराल

आजचे राशिभविष्य - 02 जानेवारी 2026

10th Pass Govt Jobs: दहावी पास असाल? मग ही दिल्लीतील सरकारी नोकरी चुकवू नका, लगेच करा येथे अर्ज

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT