Rajesh Kshirsagar esakal
महाराष्ट्र बातम्या

कोल्हापुरात राजेश क्षीरसागरांचं पोस्टर फाडलं; रवी इंगवलेंसह 10 जणांवर गुन्हा

सकाळ डिजिटल टीम

राज्यात शिवसेनेत वाद उफाळून आला असतानाच कोल्हापुरातही दोन माजी शहरप्रमुखामध्येही वादाला उकळी फुटलीय.

Maharashtra Political Crisis : राज्यात शिवसेनेत (Shiv Sena) वाद उफाळून आला असतानाच कोल्हापुरातही दोन माजी शहरप्रमुखामध्येही वादाला उकळी फुटलीय. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) व माजी शहरप्रमुख रविकिरण इंगवले (Ravikiran Ingawale) यांच्यातील या वादात दोघांनीही एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिल्यानं वाद टोकाला पोहोचलाय. क्षीरसागर यांचं पोस्टर फाडल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी आता पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आलाय.

दरम्यान, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचं पोस्टर फाडल्याप्रकरणी शिवसेनेच्या माजी शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. राजेंद्र जाधव, गुप्तजित उर्फ गुप्ता मोहिते, शैलेश हिरासकर, राकेश माने यांच्यासह अन्य ४ ते ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबतची फिर्याद रणजित नारायण जाधव (वय ४९ रा. शिवाजी पेठ) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात (Rajwada Police Station) दिलीय.

शिवेसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडात सहभागी होत क्षीरसागर यांनी गुवाहाटी गाठलं. पण, याच दरम्यान इंगवले आणि त्यांच्यातील वादाला तोंड फुटले आहे. गेले महिनाभर त्यांच्यात वाद सुरू होता. मात्र, आता या वादाने टोक गाठले आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसेनेने रॅली काढली. या रॅलीत इंगवले यांनी क्षीरसागर यांच्यावर जोरदार टीका केली. शनिवारी सकाळी शिवाजी पेठ येथील सेनेच्या विभागीय कार्यालयावर लावलेले त्यांचे पोस्टर इंगवले यांनी फाडून टाकलं होतं. याशिवाय क्षीरसागर यांच्यावर अनेक आरोप केले होते. इंगवले यांच्या आरोपानंतर क्षीरसागर यांनीही जोरदार प्रत्त्युत्तर देताना बघून घेण्याची धमकी दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : मुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरुच, रायगड, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; रेड अलर्ट जारी, पुढील ४ दिवस धोक्याचे

पोलिस उपायुक्तांचे आदेश! ट्रॅफिक पोलिस नेमलेल्या ठिकाणीच असणे बंधनकारक; ‘HSRP’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर ‘आरटीओ’ करणार कारवाई; रिक्षा चालकांना ड्रेसकोडचे बंधन

चोरीचे दागिने घेणारा सराफही आरोपी! पावतीशिवाय दागिने घेतल्यास पोलिसांकडून कारवाई; ‘या’ कलमाखाली 3 वर्षांपर्यंत कारावास अन्‌ दंडाची शिक्षा, वाचा...

जिल्हा परिषदेच्या भन्नाट योजना! महिलांना शिलाई मशीन, पिठाची गिरणी; सातवी ते बारावीतील मुलींना सायकली, टॅली, MS-CIT, कराटे प्रशिक्षण, गरीब मुलांना पैसेही

Best Banana French Toast: बिझी मॉर्निंगसाठी बेस्ट! 10 मिनिटांत बनवा बनाना फ्रेंच टोस्ट; लिहून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT