Rajesh Tope सकाळ डिजिटल टीम
महाराष्ट्र बातम्या

कोरोना परिस्थितीबद्दल केंद्राचं पत्र; राजेश टोपे म्हणतात...

राज्यातील 135 पैकी 85 रुग्ण मुंबईत आहेत, अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याने गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली होती. मात्र रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याची चिन्हं दिसत असतानाच केंद्र सरकारने काही राज्यांना पत्र पाठवलेलं आहे. त्यासंदर्भात तसंच राज्यातल्या कोरोना परिस्थितीबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाष्य केलं आहे.

केंद्राने पाठवलेल्या पत्रामध्ये इतर राज्यांचाही समावेश असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. तसंच राज्यातील 135 पैकी 85 रुग्ण मुंबईत आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली आहे. लसीकरणाच्या बाबतीत बोलताना राजेश टोपे म्हणाले की, मुलांमधलं लसीकरणाचं प्रमाण वाढलं आहे. बुस्टर डोसबद्दल केंद्राने अद्याप निर्देश दिलेले नाहीत. मात्र कोणाला बूस्टर डोस घ्यायचा असेल तर खासगी रुग्णालयातून घेऊ शकता.

परिस्थिती नियंत्रणात असली तरी नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहनही राजेश टोपे यांनी केलं असून मास्क बंधनकारक नसल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttar Pradesh News: दिवाळीपूर्वी योगी सरकारकडून किमान वेतनाचे नवे दर जाहीर; १ ऑक्टोबरपासून सुधारित वेतन लागू

Indian Railways News : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! ट्रेनमध्ये रात्री ११ नंतर मोबाईल चार्ज करता येणार नाही, नेमकं कारण काय?

Railway Recruitment 2026: पदवीधरांसाठी खुशखबर! रेल्वेत स्टेशन मास्टरच्या १,२६५ पदांसाठी भरती सुरु; अर्ज कुठे आणि कसा कराल? जाणून घ्या

Marathi News Live Updates : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी झिशान सिद्दीकी यांची नियुक्ती, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी दिलेल्या संधीबद्दल व्यक्त केली कृतज्ञता

'तुम्ही निघा इथून!' अनुपम खेर यांनी महेश भट्ट यांना भर कार्यक्रमातून हाकललं? Video पाहून नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT