Rajesh Tope on Mask  e sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात तूर्तास मास्क सक्ती नाही : राजेश टोपे

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : देशातील काही भागांमध्ये कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होताना दिसत असून, जूनमध्ये कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आवश्यक ती सर्व पाउलं उचलली जात आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. राज्यातील कोरोना रूग्णसंख्येवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे सांगत सध्या राज्यात मास्क सक्ती करणार नसल्याचे टोपेंनी स्पष्ट केले आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

(Rajesh Tope On Mask)

मंत्रीमंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. राज्यभरात मास्कसक्ती जरी लागू नसली, दंड जरी नसला तरी आम्ही रुग्णसंख्येवर लक्ष ठेवून आहोत तरी लोकांनी मास्क घालण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत जवळपास १९ जिल्ह्यात ह्रदयाच्या उपचारासाठी निधी देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातील ४ जिल्ह्यात कॅन्सर आणि ह्रदयाच्या उपचारासाठी सरकारने २५० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. असं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर राज्यात तूर्तास मास्कबंदी नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

दरम्यान केंद्राने ६ ते १२ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला परवानगी दिली असून त्यामुळे पालकांच्या चिंता मिटल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतु, आता यावर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandviya) यांनी मोठे विधान केले असून, 5 ते 12 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यासाठी आरोग्य मंत्रालय NTAGI आयोगाच्या शिफारशीची प्रतीक्षा करेल, असे म्हटले आहे. त्यामुळे या वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु होण्यासाठी पालकांना अजून काही दिवस प्रतीक्षा कारावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: अजितदादांच्या अपघात झालेल्या विमानातून मीही...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठं वक्तव्य, काय म्हणाले?

Mumbai: मुंबईत प्रवेश करताना दिसणार भव्य स्वागतद्वार! सर्व एंट्री पॉइंट्सवर प्रवेशद्वार बांधणार; रितू तावडेंची मोठी घोषणा

IND vs SA, Viral Video: गौतम गंभीरने लाईव्ह सामन्यात हार्दिक पांड्याचे कान उपटले... अरे तुला चेंडू तिथे टाकायची काय गरज!

धक्कादायक! Donald Trump यांच्या घरात बंदूक-इंधन कॅनसह घुसखोरीचा प्रयत्न; गुप्तहेरांच्या गोळीबारात संशयित ठार

Indrayani River Pollution: इंद्रायणी प्रदूषणास जबाबदार कंपन्यांवर कारवाई करणार; महापौर रवी लांडगे यांचा इशारा!

SCROLL FOR NEXT