Raju Shetti critisize shivsena sanjay raut over mla Devendra Bhuyar rajya sabha election result 2022 
महाराष्ट्र बातम्या

राजू शेट्टी राऊतांवर भडकले, तो आमदार स्वाभिमानीचा नाही...

सकाळ डिजिटल टीम

मागील काही दिवसांपासून राज्यात राज्यसभेच्या निवडणूकीची धामधूम अखेर संपली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला असून शिवसेनेच्या संजय पवार यांचा या निवडणूकीत पराभव झालेला आहे. या निकालानंतर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांच्या उल्लेखावरून राजू शेट्टी यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. (Raju Shetti critisize shivsena sanjay raut over mla Devendra Bhuyar rajya sabha election result 2022)

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी बोलताना भाजपवर जोरदार टीका केली, यामध्ये त्यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपकडून घोडेबाजार झाल्याचा आरोप केला. त्यांनी बहुजन विकास आघाडीसह अपक्ष आमदार देवेंद्र भुयार आणि संजय शिंदे यांची नावे घेत हे आरोप केले आहेत.

राऊतांनी देवेंद्र भुयार यांचा उल्लेख राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षांचे आमदार असा केल्याने राजू शेट्टी संतापले आहेत, त्यांनी फेसबुकवर यासंबंधी पोस्ट लिहीत स्पष्टीकरण दिले आहे. "संजय राऊतजी ज्या आमदाराचा उल्लेख तुम्ही स्वाभिमानीचा म्हणून केलेला आहात त्याच्या बुडावर लाथ घालून पुर्वीच आम्ही हाकालपट्टी केलेली आहे. तेंव्हा कृपा करून स्वाभिमानीचा आमदार असा उल्लेख करू नका," असे लिहीले आहे. इतकेच नाही तर त्यांनी, "तो असा का वागला या प्रश्नाच उत्तर तुम्हाला अजित पवार व जयंत पाटील देतील." असेही शेट्टी म्हणाले आहेत.

संजय राऊतांनी "राज्यसभा निवडणुकांत आमचा पराभव झाला पण भाजपचा मोठा विजय झाला नाही. आम्ही व्यवहारात पडलो नाही आणि आम्ही व्यापारही केला नाही तरी आम्हाला पहिल्या पसंतीची ३३ मते मिळाली आहेत. ज्या कुणी गद्दारी केली त्यांची यादी आमच्याकडे आहे. ज्यांनी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची नाव आमच्याकडे आहेत पण ठीके पाहून घेऊ." असा इशारा राऊतांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT