कोल्हापूर: गेल्या १२ दिवसापासून कोल्हापूर महावितरणच्या कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani shetkari sanghatana) माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरु आहे. शेतीला दिवसा दहा तास वीज मिळावी या मागणीसाठी राजू शेट्टी ठाम आहेत. आज १२ वा दिवस असूनही सरकारने दखल घेतली नाही. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी मुंडण करून १२ व्याचा सर्व विधी करून शासनाच्या नावाने बोंब ठोकली. यावेळी या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिला.
यावेळी राजू शेट्टी म्हणाले, शासनाला शेतकऱ्यांच काहीही घेणं देणं राहिलेलं नाही त्यामुळे अस दुर्लक्ष करत आहे. मात्र आम्ही शासनाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. काल राज्यभर चक्काजाम केला, निर्णय न झाल्याने एका तरूण शेतकऱ्याचा हाकनाक जीव गेला, आज १२ व्याचे सर्व विधी केले. निर्णय नाही झाला तर आंदोलन अजून तीव्र होईल असेही शेट्टी म्हणाले.
कार्यकर्त्यांनी मुंडण करून १२ व्याचा सर्व विधी करून शासनाच्या नावाने बोंब ठोकली. यावेळी या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
दरम्यान आज भाजपचे अतुल भातळरक (Atul Bhatkhalkar) यांनीही ठाकरे सरकाकवर निशाणा साधला. वीज तोडणीमुळे पंढरपुरात एका शेतकऱ्याने व्हिडिओ शेअर करत आत्महत्या केली. महाविकास आघाडी सरकार दाऊद इब्राहिमचे समर्थन करतात पण शेतकऱ्यांकडे बघायलाही यांना वेळ नाही. हे कुचकामी मुख्यमंत्री आणि भ्रष्टाचारी सरकारचे पाप आहे असा टोला त्यांनी लगावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.