raju shetti sakal media
महाराष्ट्र बातम्या

'FRP'चा दुसरा हप्ता न मिळाल्यास तीव्र आंदोलन; राजू शेट्टींचा इशारा

अजित पवार शेतकऱ्यांना फक्त आश्वासन देतात; राजू शेट्टी

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर: एफआरपीचा (FRP)दुसरा हप्ता 200 रुपये मिळावा या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. यासाठी संघटनेचे शिष्टमंडळ प्रत्येक कारखान्याला निवेदन देणार आहेत. या निवेदनाला प्रतिसाद न दिल्यास आंदोलनाची पुढची दिशा ठरविण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिला आहे. कोल्हापुरात (Kolhapur) पत्रकार परिषदेत त्यांनी हि माहिती दिली.

ते म्हणाले, एफआरपी 50 रुपयांनी वाढली असली तरी वाहतुक खर्च वाढला आहे. 3 वर्षांपूर्वी जेवढे पैसे हातात पडत होते तितकेच आताही पडत आहेत.शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. चुकीची वीजबिले, मीटर दुरुस्ती नाही, जे देणं लागत नाही ते आम्ही का भराव. वाढलेल्या विजबिला बाबत समाधानकारक उत्तर कोणीही देत नाही. जाब विचारणाऱ्या शेतकऱ्यांना 353 कलम लावले जात आहेत. 353 हे नवीन हत्यार कर्मचाऱ्यांना सापडले. नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50 हजारांच अनुदान होते त्याच काय झाले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

अजित पवार (Ajit Pawar) शेतकऱ्यांना सवलत देणार आहे म्हणतात पुढे काहीच बोलत नाहीत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सर्वाधिक वसुली आहे. आतापर्यत 60 टक्के वसुली झाली आहे. असे असताना 353 च बक्षीस का देताय आम्हाला? 2 तास वीज वाढवून द्यावी, गळती आणि चोरी कमी केली आहे तर वीज दर कमी करून दया. अशी आमची मागणी आहे.

महापुरात बुडालेला ऊस तोडण्यास टाळाटाळ करणाऱ्या कारखान्यांना सूचना द्याव्यात यासाठी जिल्हाधिकारी यांना भेटणार आहे. 6 ऑक्टोबर आणि 14 जानेवारी 2021 ला शासन निर्णय झाला. हा निर्णय महाविकास आघाडीने घेतला. महाविकास आघाडीतील जे नेते केंद्रावर टीका करतात ते आज गप्प आहेत. येत्या 14 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा तसेच दुसऱ्या हप्ताबाबत निर्णय घेतला नाही तर पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल असा थेट इशारा त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

भाई, हा तर हार्दिक पांड्याची पोल खोलतोय! R Ashwin नं नाव न घेता Mumbai Indians च्या कर्णधाराला धुतले, Video Viral

Pune Kolwan ashram suicide: कोळवणच्या चिन्मय विभूती आश्रमात २५ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात खळबळ

Rajgad Drowning Case: गुंजवणी धरणात बुडालेला दुसरा मृतदेह सापडला;दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू,राजगड तालुक्यातील हृदयद्रावक घटना!

Pune Canal Body Found: जारकरवाडीतील डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातील मृतदेहाची टी-शर्टवरील नावाच्या धाग्याने उकल

SCROLL FOR NEXT