raju shetti sakal
महाराष्ट्र बातम्या

भाजपसोबत युती करणार नाही, येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढणार : राजू शेट्टी

माळशिरस मध्ये बंद खोलीत मोजक्या कार्यकर्त्यांसोबत त्यांनी तासभर चर्चा केली आहे.

दत्ता लवांडे

सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा इशारा दिला आहे. माळशिरस तालुक्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अजित बोरकर यांनी सुरू केलेल्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी ते आले होते. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत चर्चा करण्यात आली आहे. (Swabhimani Shetkari Sanghatna Raju Shetty)

स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडली आहे. सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर कोणत्याच पक्षाशी युती करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. कोणास वाईट म्हणायचे आणि कोणास चांगले म्हणायचे हा प्रश्न पडला आहे. कोणतेच सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत नाही. बळीराजाला नागवले जात आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

सध्या विधानसभेची स्थिती नगरपालिकेसारखी झाली आहे. त्यामुळे सध्याच्या सरकारमध्ये लोकशाही राहिली नाही याच्या वेदना आम्हाला होतात त्यामुळे मी येत्या निवडणुकांत कोणत्याच पक्षांशी युती करणार नाही. स्वबळावर लढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्याचबरोबर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत कधीच भाजपशी युती करणार नाही असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान माळशिरस तालुक्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अजित बोरकर यांनी निमगाव पाटी-विझोरी (ता. माळशिरस) येथे संपर्क कार्यालय सुरू केलं आहे. या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी आले होते. यावेळी त्यांनी मोजक्या कार्यकर्त्यांसोबत बंद खोलीत तासभर चर्चा केली आहे. यावेळी येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

राजू शेट्टी यांच्या इशाऱ्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटना येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढवणार का? की ठराविक जागेवर लढणार याकडे लक्ष लागलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT