raju shetty esakal
महाराष्ट्र बातम्या

कृषीप्रधान महाराष्ट्र सरकारला लकवा मारलाय का?, राजू शेट्टी संतापले

१५ फेब्रुवारीपासून महावितरण कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरूच

सकाळ डिजिटल टीम

१५ फेब्रुवारीपासून महावितरण कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरूच

मागील काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. शेतीला दिवसा दहा तास वीज मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी (Raju Shetty) स्वत: मैदानात उतरले आहेत. १५ फेब्रुवारीपासून महावितरण (MahaVitaran) कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरूच आहे. मात्र सरकार यावर कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने त्यांनी सतंप्त प्रतिक्रिया दिली आहे. एक ट्विट करत त्यांनी महाराष्ट्र सरकारवर (Maharashtra Govt.) हल्लाबोल केला आहे.

ते म्हणतात, तेलंगणा शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज देते. कर्नाटक (Karanatka) दिवसा ७ तास मोफत वीज देते. राजस्थानने शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा निर्णय घेतला आहे, मग कृषीप्रधान महाराष्ट्र सरकारला काय लकवा मारलाय काय?, असा संतप्त सवाल त्यांनी महाविकास आघाडी सरकारला केला आहे.

दरम्यान, दहा दिवस वीज मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. राज्यसरकारला जाग यावी यासाठी राजू शेट्टी यांनी या काळात राज्यभर रस्ता रोको आंदोलन करत सरकारचा निषेधही केला आहे. त्यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या संदर्भातील वक्तव्यांचाही खरपूस समाचार घेतला आहे. आता यानंतर त्यांच्या मागण्यांवर महाराष्ट्र सरकार कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT