politics esakal
महाराष्ट्र बातम्या

संभाजीराजेंची राज्यसभेची वाट बिकट; अनिल परबांनी स्पष्टच सांगितले

शिवसेनेच्या खेळीचा परिणाम संभाजीराजे छत्रपतींच्या राजकीय भवितव्यावर होणार का?

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेच्या खेळीचा परिणाम संभाजीराजे छत्रपतींच्या राजकीय भवितव्यावर होणार का?

काही दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांनी (Sambhaji Raje Chhatrapati) पुढील निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात बदलाचे वारे वाहण्यास सुरुवात झाली असल्याचे चित्र आहे. भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडीनं आपल्याला मदत करावी, अशी विनंती संभाजी राजेंनी घातली आहे.

आगामी राज्यसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष दुसरा उमेदवार उभा करणार आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते एकत्र बसून निवडणुकीची रणनीती ठरवणार असल्याचे शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या खेळीचा परिणाम संभाजीराजे छत्रपतींच्या राजकीय भवितव्यावर होणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.

मंत्री परब म्हणाले, महाविकास आघाडी निवडणुकीची रणनीती ठरवणार आहे. महाआघाडीचा दुसरा उमेदवार शिवसेनेच्या कोट्यातून असेल आणि त्या उमेदवाराची निवड कशी करायची याची रणनीती पक्षातील नेते ठरवतील. पण मला खात्री आहे की शिवसेनेचा दुसरा उमेदवार निवडला जाईल. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजे यांच्या उमेदवारीला त्यांचा पक्ष पाठिंबा देऊ शकतो, असे संकेत दिले होते. परंतु त्यांना मविआच्या इतर दोन घटकांची मते न मिळाल्यास त्यांची निवडणूक कठीण होऊ शकते.

दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी 12 मे रोजी मोठी घोषणा केली. त्यांनी 'स्वराज्य' संघटनेची स्थापना केल्याची घोषणा केली. लोकांना स्वराज्याच्या नावाखाली एकत्र करण्यासाठी दौरा करणार आहे. जनतेला एका छताखाली कसे आणता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संभाजीराजे म्हणाले होते. तसेच सर्व पक्षांनी त्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. राज्यसभा निवडणुकीची अधिसूचना 24 मे रोजी जारी होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया 13 जून रोजी संपणार आहे.

सध्या सहा जागांसाठी राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Election) होऊ घातली आहे. सहाव्या जागेवर कोण दावा ठोकणार? असा प्रश्न होता. पण, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आम्ही आमची उरलेली मतं छत्रपती संभाजी राजेंना देऊ, असं म्हटलं होतं. आता शिवसेनेकडून मात्र याउलट वक्तव्य आलं असून सहावी जागा लढणार असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT